अकोला:- विदर्भातील प्रथम उपमहाराष्ट्र चॅम्पियन स्व. पैलवान मुरलीधर सखारामजी वानखडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भाव्य त्वचारोग व अस्थी रोग निदान शिबिर रविवार दिनांक 9 जून रोजी शिवनगर हनुमान व्यायाम शाळा येथे संपन्न झाले स्वर्गीय वानखडे सर यांची प्रतिमा पूजन हार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली डॉक्टर दर्शन तातिया एमबीबीएस एम एस जॉईन रिप्लेसमेंट अर्थोस्कोपी आणि अस्थिरोगतज्ञ तसेच डॉक्टर शिवानी अग्रवाल तातिया एमबीबीएस एमडी त्वचारोग केस विकार आणि सौंदर्यतज्ञ यांनी या शिबिरामध्ये 211 रुग्णांना आरोग्याबद्दल मार्गदर्शन व उपचार त्वचारोग निदान करण्यात आले , गरजू रुग्णांना औषध निशुल्क वाटप करण्यात आले.
प्रमुख उपस्थित शिवनगर गजानन महराज मंदिर संस्थापक अध्यक्ष किशोर फूलकर. श्रीधरजी वानखडे मा. पोलीस निरीक्षक, विलास जोशी. रुपेश वानखड़े किरण जोशी, मनोज वानखडे, उद्धव व्यवाहारे, दिलीप मालोकार,
विलास गोतमारे, किशोर देहानकर, दादा खडसने, नाना शिंदे,बाळू जुमळे, संदीप ढवळे, यांची उपस्थिती लाभली संदीप श्रीधर वानखडे, निलेश दामोदर वानखडे
यांनी परिश्रम घेतले असे आयोजक शिवनगर हनुमान व्यायम शाळा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान विभाग, अकोला हनुमान व्यायाम शाळा शिवनगर ,निलेश दामोदर वानखडे यांनी कळवले.