. गेल्या दोन वर्ष कोरोणाच्या महामारीमुळे शांत असलेल्या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर या वर्षाचा धम्मचक्र प्रवर्तक दिनानिमित्त लाखो भीमसैनिकांची निळाई पसरलेली पाहायला मिळाली महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी हिंदू धर्माचा त्याग करून लाखो बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन रूढी परंपराच्या वनव्यात ओळफळुन निघालेल्या समाजाला मानवी मूल्य देऊन समाजात मान सन्मानाने जगण्याचा मंत्र दिला याच दीक्षाभूमीवर १९५६ रोजी अस्पृश्यांच्या जीवनात निळी पहाट उगवली तो दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन असे बहुजन जनता दल संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी सांगितले यावर्षी ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तक दिन आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर सन्मानपूर्वक वढू बुद्रुक जिल्हा पुणे येथे अंत्यसंस्कार करणारे आणि नाशिक येथील रामशेज किल्ल्याचे किल्लेदार वीर योद्धा गोविंदा गायकवाड यांचे १४ वे वंशज असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योजक दिवंगत राजेंद्र शंकर गायकवाड यांच्या ६० व्या स्मृतीदिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमीवर तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक आणि अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांना बहुजन जनता दल नागपूर जिल्हा शाखेच्या वतीने भव्य मोफत भोजनदानाचे आयोजन बहुजन जनता दलाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष कैलास देशभ्रतार आणि अश्विन चांदुरकर बहुजन जनता दल नागपूर जिल्हा संपर्क नेते यांनी दीक्षाभूमी स्मारक जवळ असलेल्या लक्ष्मी नगर परिसर येथे भव्य मोफत भोजनदानाचे आयोजन करण्यात होते.
दीक्षाभूमीवर आलेल्या भीमसैनिकांना बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या हस्ते मोफत भोजनदान करण्यात आले बहुजन जनता दलाच्या भव्य मोफत भोजनदानाला दीक्षाभूमीवर आलेल्या भीमसैनिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून भोजनदानाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेवून मोठा प्रतिसाद दिला असे बहुजन जनता दल नागपूर जिल्हा अध्यक्ष कैलास देशभ्रतार आणि अश्विन चांदुरकर बहुजन जनता दल नागपूर जिल्हा संपर्क नेते यांनी सांगितले
यावेळी सौ अलकाताई अरुण रणधीर (संस्थापक अध्यक्षा रयत कष्टकरी मजूर कामगार संघटना) सतीश काळे प्रेम बागडे रवी ढोणे देवदास धराजे अक्षय काकडे किशोर राऊत सुनील पाटील सुनील धकाते सुनील वासवडे सुरेश शिंदे महाजन तिवारी आनंद गजभिये महेंद्र इंगळे धनराज राऊत मिलिंद भगत गौरव देशभ्रतार नरेंद्र मोदघर राहुल पाटील अमर प्रधान अथर्व खंडाईत प्रवीण तिरपुटे सुरेश वानखडे सुरेंद्र देठे व बहुजन जनता दल महिला आघाडी युवा आघाडी वैद्यकीय कामगार आघाडी सेवानिवृत्त सैनिक आघाडी यांच्यासह बहुजन जनता दल आणि कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे बहुजन जनता दल नागपूर जिल्हा अध्यक्ष कैलास देशभ्रतार आणि अश्विन चांदुरकर नागपूर जिल्हा संपर्क नेते यांनी कळविलेले आहे