कारंजा : महाराष्ट्र राज्य रेखाकला परीक्षा 2023 मध्ये. स्थानिक कारंजा शहरातील गोविंद न्यू इंग्लिश पब्लिक स्कूल कारंजाचा वर्ग 10 वी चा विध्यार्थी चि. निसर्ग दत्ताराम जाधव याने महाराष्ट्र राज्यातून 68 वा मेरिट येऊन शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. असे वृत्त मुख्याध्यापक संतोष चौधरी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे संजय कडोळे यांना कळवीले आहे . याबाबत अधिक वृत्त असे की, चि.निसर्ग दत्ताराम जाधव याने
आपल्या अथक परिश्रमातून, अमरावती विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला परीक्षेत तृतीय क्रमांक,पंतप्रधान कार्यालय अंतर्गत परीक्षापे चर्चा व रंगभरण स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून तालुक्यातून नावलौकीक प्राप्त केल्या बद्दल कारंजा नगरीचे तहसीलदार धीरज मांजरे याच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातून 68 वा मेरिट येऊन आपल्या शाळेचे व पालकाचे नांव उज्वल केल्याबद्दल शाळेचे अध्यक्ष किरण चौधरी, संचालक श्री. संतोष चौधरी यांनी त्याचा व त्याच्या पालकांचा व कलाशिक्षक कैलास खोपे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. चि . निसर्ग जाधव याने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक आपले आई वडील व आजोबाला दिले.कार्यक्रमाचे संचालन मनिष वडते यांनी केले.