कारंजा येथील नगर परिषद मुलजीजेठा उर्दू माध्यमिक शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्याच्या मागणीसाठी पालकांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सोमवारी (१९ सप्टेंबर) सकाळी ११.३० वाजता मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या दालनात शाळा भरवली.
या बाबत सविस्तर असे की, कारंजा नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या उर्दू व मराठी माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकांची कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होत आहे. माध्यमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढ तत्वानुसार विद्यार्थ्यामध्ये व तुकडी संख्येत वाढ होत असते. सध्या विद्यार्थी व तुकडी संख्यानुसार काही विषयांचे शिक्षक सेवानिवृत्त, रजा, आदी कारणांमुळे कमी पडत आहे. करीता आवश्यक ते विषयनिहाय शिक्षक नियमानुसार व कायमस्वरूपी नेमणुका करण्यास काही कालावधी लागू शकते. तथापि मुख्याध्यापकांनी वेळोवेळी केलेल्या शिक्षक मागणीवरून व विद्यार्थ्यांचा हित जोपासून या शाळांमध्ये शासन निर्णयानुसार नियमित शिक्षक मिळेपर्यंत घड्याळी तासिका (Clock Hour Basis) मानधनावर शिक्षक नेमणूक करावी. अशी मागणी माजी नगरसेवकांसह पालकांनी केली होती. मात्र या मागणीकडे शिक्षण विभागाने साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज सकाळी साडेअकरा वाजता विद्यार्थ्यांना घेऊन थेट नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनातच शाळा भरवली. असे वृत्त संबाधित पालक व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे . पालक विद्यार्थ्यांनी केलेल्या या आंदोलनावर काही कार्यवाही होऊन शिक्षक मिळणार की वरीष्ठ
अधिकारी नेहमी प्रमाणेच दुर्लक्ष्य करणार याकडे कारंजेकरांचे लक्ष्य लागले आहे .