ब्रम्हपुरी :-
फेडरेशनतर्फे धान खरेदी करण्यासाठी अनेक खरेदी केंद्र यंदा सुरू होणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी गावापासून बऱ्याच अंतरावर न्यावे लागते. त्याकरीता शेतकऱ्यांना वाहतूकीचा अधिक आर्थिक बोजा सहन करावा लागतो. हा अधिकचा भूर्दंड टाळण्यासाठी शेतकऱ्याने मागणी केल्यानुसार गावात किंवा गावापासून कमी अंतरावर धान खरेदी केंद्राची सुविधा उपलब्ध करून द्यावी. सद्यस्थितीत सोंद्री, पिंपळगांव भो., चिखलगांव, हरदोली, लाडज, सुरबोडी, चिंचोली, सावलगांव, झिलबोडी, परसोडी, नवेगांव मक्ता व इतर गावांमध्ये धान खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज आहे.
सद्या खरीप हंगामातील धान पिकाची कापणी सुरू झालेली आहे. मागील अनुभवानुसार धान खरेदी प्रक्रिया दोन महिन्याच्या कालावधीनंतर सुरू करण्यात आली. हे अत्यंत गैरसोईचे आहे. उशीर झाल्यामुळे व्यापारी या परिस्थितीचा गैरफायदा घेतात व शेतकऱ्याचा माल कमी दराने खरेदी करतात. ह्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे चिमूर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर, जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रपूर यांना तहसिलदार उषा चौधरी यांच्या वतीने निवेदन प्रेषित केले.
यावेळी शिवसेनेचे उपतालुका तथा सोंदरी चे सरपंच केवळरामजी पारधी, डॉ. रामेश्वर राखडे, शामराव भानारकर माजी शहरप्रमुख, अनिरुद्ध राऊत, गुलाब बागडे विभाग प्रमुख खेडमक्ता, रमाकांत अरगेलवार, प्रकाश देशमुख, विजय देशमुख, सुभाष मेश्राम, महादेव तिघरे, बाबुराव ठोंबरे, नारायण भाजीपाले, रमेश ठोंबरे, पंढरी गभने, युवराज कांबळी, प्रभाकर दोनाडकर आदीं. शिवसैनिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....