ब्रम्हपुरी येथील पेठवार्ड मधील ३५ वर्षे जुन्या राईस मिलच्या इमारतीमध्ये मल्टीप्लेक्स सुरु करण्याचा घाट गोंदिया येथील फिरोज सदरुद्दीन सोरटीया यांनी नगर परिषद व इतर प्रशासनाची जागा खरेदीपासूनच दिशाभूल केलेली आहे.वाणिज्य वापराची इमारत असतांना फक्त खाली प्लॉट आहे असून न.प. ला सांगून खाली प्लॉटची विक्री केली असून त्यानुसार त्यांनी शासनाची विक्रीकरीता लागणारा मुद्रांक शुल्क व नोंदणी फी हडप केली.मा.तहसीलदार यांच्या दि.26/11/2019 च्या पाठविलेल्या अहवालात स्पष्ट नमूद केले अशा सिनेमा गृहात परवानगी दिल्यास प्रेक्षक किंवा सामान्य जनतेच्या जीवितास धोका पोहचण्याची पुरेपूर शक्यता आहे असे स्पष्ट अहवालात नमूद केले आहे. तरी पण सदर 35 वर्ष जीर्ण राईस मिलच्या इमारती मध्ये मल्टीप्लेक्स सुरू होऊ देणार नाही असे प्रसिद्धी पत्रकात नियोजन सभापती तथा नगरसेवक महेश भर्रे यांनी केले आहे.
सदर प्लॉटवर नगर परिषदेकडून त्याला प्रारंभीक बांधकामाची परवानगी मिळाली. परंतू नगर परिषदेने दिलेल्या अटी व शर्ती सदर फिरोज सदरुद्दीन सोरटीया यांनी भंग केले. तत्कालीन मुख्य अधिकारी यांना दि. ०१/०३/२०१९ ला याबाबत तक्रार केली. तक्रारीचे अनुषंगाने तत्कालीन मुख्याधिकारी मंगेश खेवले व नियोजन विभागाचे अभियंता यांनी मौका चौकशी केली व स्वतः दिलेले नाहरकत प्रमाणपत्र रद्द केले.दिनांक २८/०५/२०१९ रोजी मा. अध्यक्ष महोदया यांना सदर जुने बांधकामाच्या ठिकाणी जर सिनेमागृह सुरु झाले तर लोकांच्या जिवाला धोका ठरु शकते व सदर चित्रपट गृहामध्ये लागणारे संडास, मुत्रीघर व सांडपाण्याची कुठलीही सोय नसून ते आयुटलेटच्या मागच्या भागाला सोडलेले आहे. जेणेकरून मागील असलेल्या दोन ते अडीच हजार लोकवस्ती असलेल्या सिध्दार्थ नगर व इतर भागातील याबाबींचा गंभीर वास होणार असल्याचे नाकारता येत नाही.तसेच या मल्टीप्लेक्समधील नियमबाह्य बांधकाम केले असून त्याठिकाणी पार्कींगची सुध्दा व्यवस्था नाही. तरी याबाबतचा विषय नगर परिषदेच्या मिटींगमध्ये घेण्यात आला व विषयाची गांभीर्यता लक्षात घेता सभागृत उपस्थित असलेल्या सर्व लोकप्रतिनिधींनी एकजुटीने त्या ठिकाणी मल्टीप्लेक्स होवू नये असा दिनांक ०१/०६/२०१९ रोजी ठराव पारीत केला. व सदर ठराव योग्य असल्यामुळे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी कलम ३०८ नुसार जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांचेकडे हा ठराव रद्द करण्याकरीता पाठविले नाही. त्यामुळे हा ठराव कायम करण्यात आला. व त्याविरुध्द शासनाकडे दाद मागण्याची सुध्दा वेळ निघून गेली. फिरोज सदरुद्दीन सोरटीया हे आताचे मुख्याधिकारी व नियोजन विभागाचे अभियंता यांचेकडून बऱ्याचवेळा भोगवटादार / वापर (Occupency Certificate) मिळण्याकरीता मागणी केली परंतु सभागृहाने घेतलेला निर्णय व मा. मुख्याधिकारी यांनी रद्द केलेले नाहरकत प्रमाणपत्र व स्वतः मौका चौकशी केली असता या ठिकाणी Occupency Certificate देणे योग्य नाही असे ठरवून त्यांना अजूनपर्यंत दिले नाही, त्याकरीता फिरोज सदरुद्दीन सोरटीया यांनी राजकीय बळावर विविध अधिकाऱ्यांना आकोट्यात घेण्याचे प्रयत्न केले. मल्टीप्लेक्सच्या (राईस मिलच्या) भिंतीला लागून असलेले शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी असणारे पारंपारीक पाट जो शासकीय नकाशावर सुध्दा आहे ते पाट सुध्दा सोरटीया यांनी बुजविले व त्याबाबत शेतकऱ्यांनी दिनांक ३१/०५/२०१९ रोजी मुख्याधिकारी यांना तक्रार केली.
तरी सदर जिर्ण बिल्डींगमधील होत असलेल्या मल्टीप्लेक्सचे बांधकाम हे मजबुत नसून भविष्यात हि इमारत कोसळून दुर्देवाने घटना घडल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्न सभापटलावर उपस्थित केला होता. त्यासंदर्भात सभेने ठराव पारीत करुन भविष्यातील त्या मल्टीप्लेक्सचा धोका व दुर्घटना लक्षात घेता जनहितार्थ त्या मल्टीप्लेक्सला परवानगी न देण्याचा ठराव घेण्यात आला. व त्या जुन्या जिर्ण बिल्डींगवर मी मल्टीप्लेक्स होणार देणार नाही असे निर्देश प्रसिद्धी पत्रकात महेश भरे यांनी दिले.