सावली - सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विषय शिक्षिका म्हणून कार्यरत उज्वला पाटील या शिक्षिकेने सातव्या वर्गातील 17 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याने उपचारकरिता दवाखान्यात भरती करण्याची पाळी आली होती. त्यांची पोलीस तक्रार करण्यात आली आहे. त्या अनुसंघाने सावली तालुका कुणबी समाज बहुउदेशीय संस्था व्याहाड खुर्द च्या वतीने विवेक जॉन्शन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर मार्फत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांना त्या नराधम शिक्षिकेला बडतर्फ करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले.
सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. दिनांक 29 सप्टेंबर रोज शनिवार ला सकाळी शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षिका उज्वला पाटील हिने सातव्या वर्गातील 17 विद्यार्थी विद्यार्थिनींना वर्गात बोलावून बेदम मारहाण केली. यात धनश्री हरिदास दहेलकर, लावण्या कुमदेव चुधरी ह्या मुली गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालय सावली येथे भरती करण्यात आले तेव्हा त्यांना प्राथमिक उपचार करून गडचिरोली येथील सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले.
याबाबतची तक्रार सावली पोलीस स्टेशनला केली. सदर शिक्षिकेवर पोलीस विभाग यांनी कारवाई केली असून त्यांना निलंबित केला आहे. परंतु पाटील मॅडम कडून ह्या गंभीर चुका वारंवार होतांना दिसून येत आहेत. तसेच शाळेत इतर समाजाचे विध्यार्थी असतांना सुद्धा फक्त कुनबी समाजातील शाळेतील हुशार विधार्थिनी यांना गंभीर असे गालावर, छातीत आणि पोटावर खुद्याने मारहाण करून यांना जखमी केले आहेत.
यावरून असे निदर्शनास येते की, शाळेत सर्व जाती धर्माचे विध्यार्थी असून सुद्धा फक्त कुणबी समाजातील शाळेतील हुशार विध्यार्थी यांना जाणीव पूर्वक मारहाण केली आहे. त्यामुळे सदर शिक्षकेला बडतर्फ करण्यात यावे यासाठी आज सावली तालुका कुणबी समाज बहुउदेशीय संस्था व्याहाड खुर्द यांचे तर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना कुणबी समाज संघटना सवालीचे अध्यक्ष अर्जुन भोयर, कोश्याध्यक्ष दिपक जवादे, सदस्य दौलतराव भोपये, सदस्य किशोर वाकूडकर, आजीवान सभासद अविनाश पाल, नरेश बाबनवाडे, सुरज किनेकार व इतर कुणबी समाज बांधव उपस्थित होते.