भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ,महामानव, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त समता सैनिक दल आरमोरी यांच्याकडून बाबासाहेबांच्या पुतळ्यास मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले.
आरमोरी येथील तथागत बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय बौद्ध महासभा संलग्नित समता सैनिक दलाच्या महिलांनी तथागत बुद्ध विहारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पवाहून अभिवादन केले. तसेच ध्वजवंदन कार्यक्रमाला सलामी दिली .अभिवादन रॅलीमध्ये सर्वात पुढे होऊन रॅलीचे पथसंचालणं केले.
समता सैनिक दलामध्ये भारती मेश्राम, भावना बारसागडे, मीना सहारे , कुमता मेश्राम ,गया जनबंधू, प्रेमीला शेंडे, रसिका इंदुरकर लता बारसागडे, प्रज्ञा निमगडे, शालीनी सुखदेवे,नर्मदा मेश्राम वर्षा मेश्राम, दुर्गा मेश्राम या कार्यरत आहेत.