स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, शिवाजी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक व मतदार साक्षरता अभियान 2024 अकोला जिल्ह्याचे ब्रँड अँबेसेडर डॉ.विशाल कोरडे यांनी नुकतेच जेष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांची भेट घेतली.
महासंस्कृती महोत्सव निमित्ताने संगीतकार श्रीधर फडके अकोल्यात आले होते यावेळी डॉ.कोरडे यांनी गायक श्रीधर फडके यांची दीर्घ मुलाखत घेतली. त्यावेळी डॉ.कोरडे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला या आंतरराष्ट्रीय संस्थेबाबत त्यांना संपूर्ण माहिती दिली. मतदार साक्षरता अभियान, संगीत क्षेत्र व दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमावर प्रश्नोत्तराच्या स्वरूपात संवाद साधण्यात आला. *नवमतदारांना आपण काय आवाहन कराल? डॉ. कोरडे यांच्या प्रश्नाला श्रीधर फडके यांनी समर्पक उत्तर दिले. लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान केले पाहिजे. स्वराज्याचे सुराज्य करायचे असेल तर आपल्या हक्कांसोबत कर्तव्य पार पाडले पाहिजे त्यासाठी १००% मतदान करणे गरजेचे आहे,असे विचार श्रीधर फडके यांनी मांडले*. *दिव्यांग सोशल फाउंडेशन संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमाबाबत आपले काय मत आहे?यावर श्रीधर फडके यांनी संस्थेतर्फे करीत असलेल्या सर्व सामाजिक उपक्रमाचे कौतुक करताना संस्थेला भरभरून शुभेच्छा दिल्या. विविध समाज माध्यमावरून त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला होता. डॉ. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात संस्था उत्तरोत्तर प्रगती करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.* महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित या मतदार साक्षरता अभियान कार्यक्रमात डॉ. कोरडे यांच्यासोबत दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य अनामिका देशपांडे,मयुरी सुळे व नेहा पलन यांनीही आपला सहभाग नोंदवला .