चिमूर:-खडसंगी येथील एकाने स्वतः च्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. दयाराम नत्थूजी भीमटे (वय ४५) असे मृतकाचे नाव आहे. खडसंगी येथील रहिवासी असलेले दयाराम भीमटे हे पत्नी व दोन मुलांसह राहत होते, दयाराम रोज मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. काही महिन्यांपूर्वी दयाराम भीमटे यांची पत्नी मानसिक रुग्णासारखी करीत होती.
त्यामुळे दयाराम भीमटें मानसिक तणावात राहत होते. या नैराश्यातूनच शनिवारी सायंकाळी राहत्या घरी घराच्या आड्याला दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, ही बाब पत्नीने शेजाऱ्यांना सांगितली, पण कुणीही विश्वास केला नाही. रविवारी दुपारी मृतकाच्या पत्नीचा भाऊ घरी आला असता जावई कुठे आहे असे विचारले असता फाशी लागल्याचे सांगितले. त्यामुळे ही घटना उघडकीस आली.