किनवट प्रतिनिधी विशाल भालेराव
इस्लापुर :
सतत नवनवे उच्चांक गाठत असलेल्या महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. कोट्यावधी लोक दारिद्र्यात ढकलले जात असून त्यांची उपासमारीने तडफड होऊ लागली आहे. बेरोजगारीने कळस गाठला असताना गरिबांना दैन्याच्या खाईत ढकलण्याचे काम मोदी सरकार करत आहे,तातडीने महागाई आणि दर वाढवण्याचे धोरन वापस झाले पाहिजे असे मत इस्लापुर येथील आंदोलनात मा.क.पा नेते काॅ.अर्जुन आडे व्यक्त केले.
गेल्या वर्षभरात पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती ७० टक्के, भाजीपाल्याच्या २० टक्के, स्वयंपाकाच्या तेलाच्या २३ टक्के, डाळीच्या ८ टक्के वाढल्या आहेत. भारतीयांच्या दैनंदिन आहारात आवश्यक असलेला गहू १४ टक्क्यांनी महाग झाला आहे. या सर्व पदार्थांचे दर सामान्य माणसांना परवडण्याच्या पलिकडे गेले आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून करायची गव्हाची खरेदी कमी होऊन ती निम्म्याहून खाली आली आहे.
पेट्रोलियमचे पदार्थ आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात सतत होणारी वाढ आणि गव्हाची टंचाई यामुळे महागाई नवनवे शिखर गाठत आहे. त्यात कोळसा टंचाईच्या बातम्यांमुळे विजेचे दरही वाढत आहेत.
अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सर्व पेट्रोलियम पदार्थांवरील सेस आणि सरचार्ज कमी करून विशेषतः स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घेतली पाहिजे,
बी बियाने कीटकनाशके खते यांच्या दरवाढीला आळा घातला पाहिजे या मागणी साठी इस्लापुर येथे मा.क.पा च्या वतिने जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदलनात पेट्रोलियम पदार्थांवरील सर्व प्रकारचे सेस/सरचार्ज मागे घ्या.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गव्हाचे वितरण पूर्ववत करा.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्व जीवनावश्यक वस्तू, विशेषतः डाळी आणि खाद्यतेलाचा पुरवठा करा.
आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना दरमहा रु. ७,५०० हस्तांतरित करा.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या तरतुदीत वाढ करा.
बेरोजगार भत्ता देण्यासाठी केंद्रीय कायदा करा.शहरी भागासाठी रोजगार हमी योजनेचा कायदा करा.
सर्व रिक्त जागा त्वरित भरा ,बी बियाने खते कीटकनाशके यांची दरवाढ वापस घ्या ही मागणी करण्यात आली.
आंदोलनात अर्जुन आडे,शेषराव ढोले,स्टॅलिन आडे,अनिल आडे,आनंद लव्हाळे, राम कंडेल,इरफान पठाण,साईनाथ राठोड, परमेश्वर जाधव,सुनिल राठोड,यल्लया कोतलगाम,शेषराव राठोड,शिवाजी किरवले,शेषराव ढोले, साईनाथ लिंगपुजे, लिंगया कोड,परमेश्वर गायकवाड, पुजाराम खोकले, धनराज आडे , सुनिल राठोड,प्रकाश वानखेडे,सुमिञा वानखेडे, सुरेखा मेढके, मंगला संभाजी ,सटावजी नखाते,राम नखाते आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....