दिनांक 21एप्रिल रोजी अल्पोपोहर करण्यास जात असतांना आनंदवन चौक ते शेगाव (बु) रोड लगत आयटीआय जवळ दुचाकी गाडीने येवुन लुटमार करणाऱ्या दोन आरोपींना दिनांक22 एप्रिल ला अटक करण्यात आली, अक्षय मोहन सहारे वय 35 वर्ष राह. कांलरी वार्ड वरोरा ता. वरोरा जि. चंद्रपुर, 2) आकाश उर्फ गोलु वाल्मीक पाझारे वय 32 वर्ष राह. कर्मविर वार्ड वरोरा ता. वरोरा अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी दीं 21एप्रिल रोजी तक्रारक्रते त्यांच्याकडे 10,000/- रु ची मागणी करीत खीशातील व मैत्रीनीच्या हातातील मोबाईल फोन एकुन कि. 30,000/- रु चा माल हिसकावुन पळून गेल्याची तक्रार वरोरा पोलीस स्टेशन येथे देण्यात आली. चोरीच्या या तक्रारीवरून वरुन पो. स्टे. वरोरा यांनी अज्ञात आरोपींवर कलम 309(4), 308(3), 126(2),3 (5) भा.न्या.स.2023 प्रमाणे गुन्हा नोंदविलाहोता.चोवीस तासात गुन्हातील अज्ञात आरोपीचा पोलिसांनी शोध घेवुन अटक केली. आरोपींकडून जबरी चोरी केलेले रिअलमी कंम्पनीचा लाल रंगाचा मोबाईल कि. 10,000/- रु, काळ्या रंगाचा रेडमी कंम्पनीचा मोबाईल कि. 20,000/- रु , गुन्हात वापरलेली मो. सा. क्र. एम.एच.34 एक्स 0441 कि. 80,000/- रु, असा एकुन 1,10,000/- रु माल सदर दोन्ही आरोपीकडुन जप्त करण्यात आला आहे.
सदरकारवाही पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनात डि.बी. चे पोलीस उप निरीक्षक दिपक ठाकरे, दिलीप सुर, मोहन निसाद, मनोज ठाकरे, महेश गावतुरे, विशाल राजुरकर, संदिप मुळे, संदीप वैद्य तसेच सायबरसेल चंद्रपुर येथील सपोनी झाडुकर सा. व त्याच्या टिमची मदत घेण्यात आली.