हिटर वर पाणी गरम करण्याकरिता गेलेल्या एका 28 वर्षीय गर्भवती महिलेला विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे घडली असून सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहिती नुसार, विरुर रेल्वे वसाहतीत वास्तव्य करत असलेले गोपाल महानंद, ज्युनियर इंजिनिअर P / Way रेल्वे विभाग मागील काही दिवसांपासून कार्यरत आहे. नुकतेच सात आठ महिन्या अगोदर त्याचे सोनी बाग हिच्याशी लग्न झाले, नवीन संसार थाटून आपल्या आई बहिणी सोबत तो रेल्वे क्वार्टर मध्ये राहत होता.
घटनेच्या दिवशी काल सकाळी आठ वाजता च्या सुमारास सोनी ही घर कामे करीत हिटर वर गरम पाणी करण्यासाठी गेली असता अचानक तिला विजेचा शॉक लागून बेशुद्ध अवस्थेत खाली कोसळली, त्यामुळे तात्काळ तिला विरुर येथील खाजगी दवाखाण्यात नेले परंतु तिचीअवस्था अधीकच गंभीर असल्याने राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरकडून तिला मृत घोषित करण्यात आले. मृतक सोनीने घटस्फोट घेऊन गोपाल याच्याशी लग्न केले होते, तिच्या पश्चात्य एक पाच वर्षीय मुलगी आहे व ती क्राइस्ट इंग्लिश कॉन्व्हेंट मध्ये शिक्षिका म्हणून अगोदर कार्यरत होती मात्र सदर दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलसानी आकस्मिक मृत्यूचे नोंद करून पुढील तपासणीसाठी मृत्युदेह शवविच्छेदन करीता पाठविले आहे. पुढील तपास विरुर पोलिस करीत आहे.