बाेडधा(हळदा) (ब्रम्हपुरी)- तालुक्यातील ब्रम्हपुरी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या बाेडधा येथील अंगणवाडी क्र.१ च्या विद्यमाने राष्ट्रीय पाेषणमाह अभियानास प्रारंभ करण्यात आला असुन त्या अंतर्गत आहाराचे महत्व सांगण्यात आले.
एकात्मिक बाल विकास सेवा याेजनेच्या माध्यमातून राष्ट्रीय पाेषणमाह अभियान १ ते ३० सप्टेंबर पर्यत राबविले जाणार आहे.या अभियानामध्ये किशाेर मुली,गरोदर माता,स्तनदा माता अशा सर्व महिलांच्या अाराेग्याबाबत जनजागृती व तसेच प्रसुतीपुर्वी पासुन प्रसुतीपर्यत याविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली.या कार्यक्रमात आहाराचे महत्व,आहाराची पाककृती,गराेदर माता आहार,लसीकरण, अतिसार,निमाेनिया,आहार व पाेषण ई.विषयावर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला सरपंच मनिषाताई झाेडगे, रेखा ठाकरे आशा वर्कर,पल्लवी ठाकरे,मनिषाताई ठाकरे,काजल खाेब्रागडे,जयश्री ठाकरे आदी महिला उपस्थित हाेत्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका शेवंता खाेब्रागडे,अंगणवाडी मदतनीस दुर्गा बदन यांनी सहकार्य केले.