कारंजा (लाड) नेमक्याच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्यात.आणि लवकरच म्हणजे ऑक्टोंबर 2024 मध्ये विधानसभा निवडणूका होणार असल्याची घोषणा झाली.त्यामुळे लोकसभा निवडणूकीत महायुती आणि महाविकास आघाडीत असणारे पक्ष कामाला लागले असून, विजय आपलाच ह्या आत्मविश्वासाने काहींनी तर मतदार संघातील जनतेच्या भेटीगाठी घेणे आरंभ करीत प्रचाराला सुरुवातच केलेली आहे. कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघ आणि मतदार संघा बाहेरील डझन दिड डझन नेते कारंजा विधानसभा मतदार संघावर दावा करीत असून,त्यांचे आपआपल्या परीने प्रयत्न सुरु झालेले आहेत.गेल्या दहा वर्षापासून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघ हा सत्ताधारी भाजपाचा गड म्हणून ओळखल्या जात असून या ठिकाणी दिवंगत आमदार स्व. राजेंद्र पाटणी यांनी निर्विवाद सत्ता स्थापन केलेली होती.आपल्या कार्यशैलीने गेल्या पंचवार्षिक मध्ये त्यांनी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी मिळवून,अनेक खेडोपाडी विकासात्मक कामे करतांना ग्रामिण रस्त्याची,पांदण रस्त्याची,सभागृहाची कामे देखील पूर्णत्वास नेलेली आहेत. व कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचा सर्वोतोपरी विकास आराखडा देखील तयार करण्याचे स्वप्न पाहिले होते.परंतु दुदैवाने त्यांचे प्रदिर्घ आजाराने आकस्मिक निधन झाले. व त्यांनी मंजूर करून आणलेल्या पुढील विकासकामांना अडथळे निर्माण होतात की काय ? अशी भिती निर्माण झाली.परंतु त्यांचे निधनाने खचून न जाता त्यांच्या मुलाने ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनी वडिलांची स्व. पाटणी साहेबांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली.आमदार स्व. राजेंद्र पाटणी यांनी मंजूर केलेली कामे पूर्णत्वास नेण्याकरीता उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचेकडे पाठपुरावा केला. व सर्व कामे बिनदिक्कत पूर्ण करण्याचा सपाटा सुरू केला.मतदार संघात दौरे करून व सातत्याने जनसंपर्क ठेवून,कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाची कर्मभूमी म्हणून निवड केली आहे.कमी वयात भरपूर मेहनत,दांडगा संपर्क, उत्कृष्ट वक्तृत्वशैली आणि मतदार संघाचा विकास करण्याची महत्वाकांक्षा यामुळे ज्ञायक राजेंद्र पाटणी हे भाजपा पक्षातून उमेद्वारी मिळविण्याकरीता,प्रथम क्रमाकांचे दावेदार मानले जातात. पक्षश्रेष्ठी देखील उमेद्वारी साठी त्यांच्या नावाचा विचार करू शकतात.शिवाय दिवंगत आमदार स्व.राजेंद्र पाटणी यांना मानणाऱ्या भाजपा श्रेष्ठींची आणि चाहत्या वर्गाची सहानुभूती निश्चितच ज्ञायक पाटणी यांना मिळू शकते.मतदार संघाच्या सर्व्हेक्षणातून आपण असा अंदाज घेतल्याचे मत महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा करंजमहात्म्य परिवाराचे सर्व्हेसर्वा असलेले ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी मांडले आहे. तसेच भाजपा मध्ये ज्ञायक पाटणी यांच्या शिवाय अन्य नेत्यांची देखील उमेद्वारी मिळविण्याकरीता स्पर्धा होऊ शकते.असेही त्यांनी म्हटले आहे. त्याशिवाय कारंजा विधानसभा मतदार संघाला कर्मभूमी मानणाऱ्या धाबेकर परिवाराचा सुद्धा येथे दांडगा जनसंपर्क असून,कारंजाचे दिवंगत आमदार तथा माजी मंत्री योजना महर्षी स्व.बाबासाहेब धाबेकर यांना मानणारा त्यांचा समाज आणि मित्रमंडळी देखील येथे बहुसंख्येने आहेत.त्यामुळे सहकार नेते सुनिल पाटील धाबेकर हे नेहमी मतदार संघात आणि कारंजेकरामध्ये मिळून मिसळून संबध जोपासत आहेत.त्यामुळे आता पुष्कळ झाले आपण यावेळी निवडणूक लढाच असा. आग्रह त्यांच्या कार्यकर्त्याकडून होत आहे.याशिवाय स्थानिकचे माजी आमदार स्व. प्रकाशदादा डहाके यांचा चाहतावर्ग या मतदार संघात मोठ्या प्रमाणात असून, स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती व ग्रामपंचायत, सोसायट्या मध्ये डहाके गटाची सत्ता आहे. दुदैवाने आपले राज्य कोव्हिड 19 कोरोना महामारी संकटाचा मुकाबला करीत असतांनाच अचानकपणे स्व. प्रकाशदादा डहाके यांचे निधन झाले. आज स्व. प्रकाशदादा डहाके जरी आपल्या मधून निघून गेले असले तरी त्यांचे आदर्श, त्यांचे विचार येथील जनमाणसामध्ये जीवंत असून, डहाके परिवाराविषयी येथील लोकांच्या मनात आपुलकी आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारातील सदस्य विशेषत: श्रीमती सईताई डहाके ह्या कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढल्यात तर कदाचित त्यांच्या रूपाने कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाला स्थानिकच्या महिला आमदार मिळण्याची शक्यता देखील बोलली जात आहे.याशिवाय जिल्हा परिषदचे लोकप्रिय अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे, काँग्रेसचे देवानंद पवार,पुसदच्या नाईक कुटुंबातील मोहिनीताई नाईक,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे माजी अव्वल सचिव अमोल पाटणकर,प्रहारचे हेमेन्द्र ठाकरे,बंजारा समाजाचे व शिवसेनेचे नेते अनिलजी राठोड,डॉ महेश चव्हाण इत्यादी अनेक दिग्गज नेते कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत.त्यामुळे येत्या काळात महायुती महाविकास आघाडी कायम रहाते किंवा प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार ? तसेच कुणाला कोणत्या पक्षाची उमेद्वारी मिळते ? हे बघायला तिन चार महिन्याचा अवकाश लागणार आहे.