वाशिम : जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय राठोड यांनी सन 2019 च्या विधानसभेचा कार्यकाल संपत आलेला असतांना नुकतीच जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समिती स्थापन केलेली असून सदर समितीवर वाशिम जिल्ह्यातील उमरा (शमशोद्दिन) येथील रहिवाशी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण (महाराष्ट्र शासन) तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा (महाराष्ट्र शासन) पुरस्कार प्राप्त असलेल्या शाहिर संतोष खडसे यांची नियुक्ती केली आहे.त्यांच्या नियुक्ती मुळे संपूर्ण वाशिम जिल्ह्यात आनंदोत्साहाचे वातावरण असून कलावंता कडून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.यानिमिताने विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा (लाड) यांचे कडून,गुरुवार दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक वाशिम येथे,महाराष्ट्र शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यीक तथा अष्टपैलू कलाकार प्रज्ञानंद भगत यांच्या अध्यक्षतेखाली,सर्वप्रथम नवनियुक्त सदस्य शाहीर संतोष खडसे यांचे हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण व अभिवादन करण्यात आले.त्यानंतर जिल्हा मानधन निवड समितीचे माजी सदस्य,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा (महाराष्ट्र शासन) पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांचे हस्ते नियुक्ती बद्दल शाहिर संतोष खडसे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील लोककलावंत गायक निरंजन भगत, गायिका सौ. विद्याताई भगत, शाहीर दत्ताराव वानखडे, शाहीर विश्वनाथ इंगोले, सुप्रसिद्ध तबला वादक मदत भगत आणि यशवंता खडसे, हार्मोनिअम वादक उत्तम भगत, लोककलाकार ज्ञानबा टाले, देवीदास मैदकर,पांडूरंग मनवर, माणिक भगत, प्रकाश शृंगारे, दिलीप वानखडे,नारायण इंगोले, विदर्भ लोककलावंत संघटनेचे लोमेश चौधरी,प्रदिप वानखडे, कैलास हांडे उपस्थित होते.यावेळी शाहीर संतोष खडसे यांचे अभिनंदन करतांना संजय कडोळे म्हणाले, "ग्रामिण भागातून येणाऱ्या शाहीर संतोष खडसे यांच्या नियुक्तीमुळे, तळागाळातील ग्रामिण भागातील रहिवाशी पात्र कलावंताना न्याय मिळून वृद्धापकाळी त्यांना महाकलासन्मान मानधन मिळू शकणार आहे.त्यामुळे शाहीर संतोष खडसे यांचे आम्ही अभिनंदन करीत आहो." शेवटी युवा कलावंत कैलास सुरेश हांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.