देशाचे माजी पंतप्रधान अर्थशास्त्री समाजसेवक डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाने फार मोठी हानी झाली असून देशाच्या विकासामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान न विसरण्यासारखे असून त्यांच्या आत्म्याला शांती सद्गती प्राप्त हो शब्दात खासदार अनुप धोत्रे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
रिझर्व बँकेचे गव्हर्नर, देशाचे अर्थमंत्री पंतप्रधान अशा वेगवेगळ्या तसेच वेगवेगळ्या केंद्रामध्ये सचिव म्हणून वेगवेगळ्या डिपारमेंट मध्ये काम करता व असणारे प्रशासकीय आणि राजकीय सामाजिक क्षेत्राचा मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाने फार मोठी हानी देशाची झाली अशा शब्दात भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
भाजपा आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, किशोर पाटील तेजराव थोरात अर्चना मसणे विजय अग्रवाल जयंत मसने सुमनताई गावंडे सिद्धार्थ शर्मा एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर डॉक्टर अभय जैन, चंदाताई शर्मा वैशालीताई निकम उमेश पवार माधव मानकर गिरीश जोशी अंबादास उमाळे, सुलभाताई सोळंके यांनी सुद्धा देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दुखद निधनाबद्दल शोक संवेदना व्यक्त करून त्यांच्या परिवाराला दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर प्रदान करू व त्यांच्या देशसेवा देशाच्या विकासामध्ये योगदानाला नेहमी देश आठवण ठेवेलअशा शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.