कारंजा : आजकाल जुने लोककलेचे प्रकार मागे पडून आधुनिक काळात डीजेच्या तालावर नृत्य करण्याचा नवा पायंडा पडत आहे . परंतु ही एक गंभीर बाब असून, डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने अक्षरशः विहीरीतील पाणी उसळ्या मारीत असते . तर इमारतींना देखील हादरे बसत असतात. कित्येक व्यक्तिच्या कानठळ्या बसून बधिरपण येण्याची शक्यता असते .शिवाय कमकुवत किंवा कमजोर व्यक्तिचे हृदय धडधडत असते . त्यामुळे आजारी व्यक्ती तसेच रक्तदाब असणार्या व्यक्तिंनी सावध राहून डीजेच्या कर्णकर्कश आवाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे .