महात्मा गांधी कला विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे रोजगार व स्वयंरोजगार समिती अंतर्गत २१ ऑगस्ट २०२३ रोजी "आंतरराष्ट्रीय उद्यामिता दिवस" निमित्त एक दिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी भूषविले तर कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून यशस्वी उद्योजक तथा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. प्रदीप मेश्राम उपस्थित होते.
सदर एकदिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री प्रदीप मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता, नाविन्यपूर्ण कल्पना तसेच विविध आवश्यक गुण इत्यादी बाबत मार्गदर्शन करीत त्यांनी स्वतः उद्योग सुरू करताना आलेले अनुभव, विविध अडचणी आणि त्यांचे निराकरण तसेच उपलब्ध व्यावसायिक संधीचे सोने कसे करावे इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले व शेवटी प्रश्नोत्तरांच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न व शंकांचे निरासरण करीत विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी प्रेरित केले.
अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. खालसा सर यांनी विद्यार्थ्यांना दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकसंख्या व बेरोजगारी सोबतच देशाच्या आर्थिक विकासासाठी सुशिक्षित तरुणांमध्ये आवश्यक असलेले उद्योजकतेचे कौशल्य आणि औद्योगिकदृष्ट्या मागास असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात व्यवसायाच्या उपलब्ध असलेल्या विविध संधी इत्यादीबाबत मार्गदर्शन करीत नौकरीपेक्षा व्यवसाय करण्याचे विविध फायदे विद्यार्थ्यांना उदाहरणांसह पटवून सांगितले. तसेच शिक्षणासोबतच व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी महाविद्यालयाच्या परिसरात तसेच स्थानिक बाजारपेठेत विविध व्यावसायिक प्रयोग करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करीत भविष्यात यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रेरित केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. तेजस गायधने यांनी केले तर प्रस्तावना वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. मनोज ठवरे यांनी केली व आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे रोजगार व स्वयंरोजगार समिती प्रमुख प्रा. पराग मेश्राम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.अश्विन मेश्राम प्रा. सायली जांभुळकर व प्रा. ललित हाडके यांनी सहकार्य केले.