आरमोरी :- युवारंग संघटना, आरमोरी तर्फे दि .१२ मे २०२४ पासुन सुरू असलेल्या युवारंग समर कॅम्प मध्ये आज दि.१७ मे २०२४ ला वन्यप्राणी व निसर्गसाखळी याबाबत माहिती देण्यात आली ज्यामध्ये सातत्याने होणाऱ्या वृक्षाच्या कतलींमुळे निसर्गाचे समतोल बिघडत आहे तापमानात वाढ होत आहे त्यामुळे वृक्ष लावून निसर्ग जपण्याचा काम आपन केले पाहिजे असे मार्गदर्शन मा.अविनाश मेश्राम साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी, आरमोरी यांनी केले तर याच निसर्गात असणाऱ्या वन्यजीवांचे संरक्षण आपण केले पाहिजे असे मार्गदर्शन सर्पमित्र व वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था, आरमोरी चे अध्यक्ष मा.देवानंदजी दुमाणे यांनी केले निसर्ग साखळीत महत्वाचे घटक असलेल्या सापांबद्दल माहिती दिली ज्यामध्ये नागसाप ,घोणस,मण्यार, फुरसे,पटेरीमण्यार हे विषारीसाप तर उडता,सोनसर्प,मांजऱ्या,हरणटोळ,वाळा,नानेटी(वाश्या),पानडदिवट (धोंड्या) हे निमविषारी तर अजगर ,काळडोक्या,तस्कर(डोंगरवेल्या), रुखई (वेल्या),धुळनागिन , गवत्या, धामण,कवड्या, कुकरी, फुरफुरी,शेवाळी पानदिवट , गांडूळ यासारख्या बिनविषारी सापांबद्दल माहिती दिली सापाचे निसर्ग साखळी मध्ये खुपमहत्व आहे साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे जो शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या उंदरांची शिकार करतो तर सर्पदंश झाल्यास काय उपचार करावे याबाबत सविस्तर माहिती दिली गेली याप्रसंगी दरवर्षी वृक्षलागवड करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली कार्यमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आरमोरी तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मा. अविनाशजी मेश्राम सर , वृक्षवली वन्यजीव संरक्षण संस्था ,आरमोरी चे अध्यक्ष मा. देवानंदजी दुमाणे उपस्थित होते याप्रसंगी युवारंग समर कॅम्प चे संयोजक रोहित बावनकर, धनराज कांबळे, आशुतोष गिरडकर ,साक्षीताई कुंभारे व पालक वर्ग उपस्थित होते.