कारंजा :- येथून जवळच असलेल्या ग्राम यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात ०६ मे रोजी आदिशक्ती महिला बहुद्देशीय संस्था वाल्हई तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुस्तक पेढी योजनेअंतर्गत दहावीच्या २९ तर नववी च्या २१ होतकरू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाच्या संचांचे वितरण करण्यात आले.
बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीचे मुख्याध्यापक विजय भड यांच्या हस्ते विद्यार्थीना पाठ्यपुस्तक संचाचे वाटप करण्यात आले.
गोपाल काकड यांनी आपल्या प्रास्तविकात क्रांतीज्योती पुस्तकपेढी योजनेचे उद्देश सांगून शासनाचा कोणताही निधी न घेता ही संस्था सामाजिक बांधिलकी म्हणून होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून २०१६ पासून हे कार्य अखंड पणे करीत आहे. यानंतर उपस्थित दहावीच्या२९ व नववीच्या २१ विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकाच्या संचाचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक विजय भड म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुस्तक पेढी योजनेअंतर्गत आमच्या विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना संच उपलब्ध करून दिलेत त्याबद्दल आदिशक्ती महिला बहुद्देशीय संस्थेच्या सर्व संचालक मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करून, आभार मानले व विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन जीवनात यशस्वी व्हावे असे आव्हान केले.
कार्यक्रमाचे संचालन शाळेचे शिक्षक अनिल हजारे तर आभार राजेश शेंडकर यांनी मानले. यावेळी बहुसंख्य गांवकरी पालक व विद्यार्थी आणि शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्म.उपस्थित होते.