कारंजा : स्थानिक महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचा सर्वदूर संपर्क असल्यामुळे अनेक ठिकाणाहून परिषदेकडे बातम्या येत असतात.त्या येणाऱ्या बातम्यांमध्ये,काही बातम्या तर अतिशय भिषण आणि भयावह स्वरूपाच्या असतात.व बातम्या पाठविणाऱ्या घायाळ शेतकर्यांना त्यांचे दुःख सरकार दरबारी पोहचून शासकिय मदत मिळावी ही अपेक्षा असते. सध्या अमर्याद प्रदूषण,वृक्षतोड आणि पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासामुळे,ऋतू हे ऋतू राहीलेले नसून, हवामान तज्ञाचे अंदाजापेक्षाही वेगळेच काहीतरी घडत असल्यामुळे निसर्गराजा मानवावर कोपलाय की काय? अशी शंका येऊ पहात आहे. प्राप्त माहितीनुसार परतीच्या पावसाला सुरुवात झालेली असली तरीही,बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाचा,चांगलाच परिणाम महाराष्ट्रात जाणवत आहे. त्यामुळे कोठे कोठे प्रचंड मुसळधार ढगफुटी देखील होत आहे. त्यामुळे पूर्व विदर्भात तर हाहाकार उडाल्याची परिस्थिती आहे. शहरांमध्ये सिमेंटच्या जमिनी आणि सिमेंटच्या इमारती वाढल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरायला जागा उरलेली नाही. हल्ली गावखेड्यांची स्थिती सुद्धा यापेक्षा वेगळी राहीली नाही. आणि मिळालेल्या काही वृत्तांवरून सध्य रात्री बेरात्री मध्यरात्री ढगफुटी सदृश्य कोसळधारा बरसत आहेत. अचानक बरसणाऱ्या धारांमध्ये विद्युत लाईन देखील गुल होण्याचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे नागरिकांचे हाल होतांना दिसत आहेत.नुकतेच नागपूरकरांचे शुक्रवारी 12 : 00 नंतर म्हणजे दि. 23 सप्टेंबर 2023 शनिवारच्या मध्यरात्री (पूर्वार्धात) 02:00 ते सकाळी O5 : 00 पर्यंत कोसळलेल्या प्रचंड पावसाने बेहाल झाल्याचे व नागपूरात प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आले. अशीच दुसरी घटना बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील ग्राम लोणवाडी येथे दि. 23 सप्टेंबर 2023 च्या शनिवारच्या रात्रीचे उत्तरार्धात 11:00 नंतर घडली असून,या खेड्यात कोसळधारा कोसळून अनेकांच्या घरात पाणी घुसले. कित्येकांची घरावरील छप्पर उडून गेले. कोठ्यात दावणीला बांधलेली 35 ते 40 गुरेढोरे मृत्युमुखी पडली. रात्र संपून रविवारी दिवस उजाडल्यावर चोहीकडे मृत जनावरांचा खच दिसत होता. असे वृत्त भ्रमण ध्वनीवरून कळविण्यात आल्याचे वृत्त हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांना मिळाल्याचे त्यांनी कळविले आहे.
तसेच पुढील तिन ते चार दिवस संपूर्ण महाराष्ट्रावर मुसळधार पाऊस भाग बदलवीत पडणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी यांनी सतर्क रहावे. एकमेकांच्या संपर्कात असावे. पूराच्या पाण्यात जाऊ नये. ढगांचा गडगडाट होत असतांना शेतात आणि हिरव्या झाडाखाली थांबू नये. जीवीताची काळजी घ्यावी.असे आवाहन करण्यात येत आहे.