चंद्रपूर : मागील अनेक महिन्यापासून दुर्गापुरात दहशत माजविणाऱ्या अनेकांचे बळी घेणारा त्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश मिळाले.
आज पहाटे 4 वाजताच्या सुमारास वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला, मात्र हा तो नरभक्षक बिबट आहे की नाही हे यावर सध्या प्रश्नच आहे, कारण 1 महिन्यांपूर्वी असाच बिबट पिंजऱ्यात अडकला होता मात्र तो नरभक्षक नव्हता.
पहाटेच्या सुमारास सदर मानवी जीवनास धोकादायक ठरणारा बिबट दुर्गापूर परिसरात फिरत होता, वनविभागाच्या गस्त करणाऱ्या चमूने बिबट्याला डॉट मारून बेशुद्ध करीत जेरबंद केले.