तालुक्यातील आवळगाव येथील गावाबाहेरील जंगलात गळफास घेवून इसमाने आत्महत्या केल्याची घटना दिनांक ११/७/२०२२ ला उघडकीस आली.
सुभाष रामभाऊ भोयर वय वर्षे अंदाजे ३४ असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव असून आवळगाव येथील रहिवासी आहे.
सुभाष हा काहीं दिवसापासून अंदाजे सात ते आठ दिवसापासून बेपत्ता असल्याची गावचर्चा आहे. मृत शरीर झाडाला अडकून जीर्ण अवस्थेत मिळाला आहे.आई बाबा नसल्यामुळे सुभाष भोयर हा कुटुंबात एकटाच राहत होता.
घटनेचा पुढील तपास संबधित पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी करीत आहेत