वाशिम ; देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांना आज १९ नोव्हेंबर रोजी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पूष्पहार अर्पण केला.यावेळी सहाय्यक अधीक्षक सुनील घोडे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात २५ नोव्हेंबरपर्यंत कौमी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.त्यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली घूगे यांनी उपस्थितांना शपथ दिली.एकात्मता शपथ पुढीलप्रमाणे “ मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो/ घेते की ,देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी मी निष्ठापूर्वक काम करीन."
मी अशीही प्रतिज्ञा करतो/करते की, मी कधीही हिंसाचाराचा अवलंब करणार नाही.तसेच मी सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय वा आर्थिक गा-हाणी शांततामय आणि सांविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन.