वाशिम :- दिनांक 07/05/2025 रोजी रात्री ठीक 10.30 वाजता जुनी IUDP परिसरात एका वयोवृद्ध अनाथ आजी चक्कर येऊन रोडवर पडली असताना अशी कॉल द्वारे माहिती सामाजिक कार्यकर्त्यां वैशालीताई आरू मॅडम यांनी महिला समुपदेशन केंद्राला कळविले,त्यावेळी तेथे लगेच समुपदेशक श्री.अरुण हिरवे गेले असता त्या आजीबाईला वैद्यकीय मदत हवी असल्याचे कळाले, तेव्हा तेथे दंडे काकू, पियू दंडे,सौ. तारामती शिंदे या सुद्धा हजर होत्या, त्यांनी त्या आजीला बोलताही येत नव्हते. त्यांना थोडेसे जेवण व पाणी दिले. नंतर 10 मी. मिनिटांनी त्यांनी आपले नाव सांगितले. त्यांचे नाव सुराबाई काळे असे होते,त्यांचे गाव करमाळा, जिल्हा सांगली असे सांगितले.नंतर त्यांची तब्येत बघून " एक हात मदतीचा " म्हणून त्यांना खाजगी वाहनाने हॉस्पिटलमध्ये नेऊन भरती करण्यात आले, यावेळी महिला समुपदेशन केंद्राचे समुपदेशक अरुण, हिरवे मोहिनी जुमडे व शांतिनिकेतन महिला विकास समितीच्या अध्यक्षा सौ.वैशालीताई आरू मॅडम (समाजसेविका) ह्या उपस्थित होत्या.