जालना:- जालना येथील मधुबन हॉटेल याठिकाणी जिल्हा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन च्या कार्यकारणी निवड FECAMबैठक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष श्री.अरूण अवघड पाटील यांच्या अध्यक्षतेखालील पार पडली..
दरम्यान त्या बैठकीत सर्वानुमते जाफराबाद तालुक्यातील वरूड बुद्रुक येथील इंजिनिअर प्रल्हाद पाटील घाटगे यांची इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएन जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
तसेच उपाध्यक्ष निलेश सोनूने, कार्याध्यक्ष साजिया शेख, सचिव संजय राठोड माजी जि. प. सदस्य, सहसचिव मयूर देशपांडे, कोषाध्यक्ष माधव शिंदे, सहकोषाध्यक्ष राहुल शिंदे, सदस्य अजिंक्य घोगरे, अंकुश बाभुळगावकर, अभय धांडे पाटील, दिगंबर घोगरे, आकाश अन्नपूर्णे, बाळासाहेब भिसे, स्वीकृत सदस्य सय्यद अल्ताफ, दत्ता बनसोडे, सुशील पिशोरे, विशेष निमंत्रित सदस्य दत्ता नाना अर्दड, संदीप पाटील विश्वभर टोपे यांच्यासह आदींची निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी FECAM संघटनेचे राज्याचे माजी अध्यक्ष श्री अरूण अवघड, माजी उपाध्यक्षसुहास मांडे, संजय शेजवळ शेख गणी, वीरेंद्र धुत यांच्यासह आदींची उपस्थिती होती
यादरम्यान नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष इंजी. प्रल्हाद पाटील घाटगे यांनी सर्वांचे आभार मानले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....