अकोला (विशेष प्रतिनिधी संजय कडोळे) : अकोला जिल्हा-विद्युत मंडळ तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्या अकोला या संस्थेची सन 2023-2028 या पंचवार्षिक वर्षाकरीता नुकतीच अविरोध निवडणुक होऊन, सदर निवडणुकीमध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव, खजिनदार इ नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या संदर्भात संजय कडोळे यांना मिळालेल्या वृत्तानुसार,अकोला येथे असलेल्या पतसंस्थेच्या कार्यालयात काही दिवसांपूर्वी पिठासिन निवडणूक अधिकारी. मा.भाकरे मॅडम जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जाहीर सभेत, ज्येष्ठ कामगार कार्यकर्ते अनिल सोळंके यांच्या नावाची, एकमताने अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून. श्रीमती. वंदना उबरहणडे, मानद सचिव म्हणून कीशोर करडे, खजिनदार म्हणून निलेश चहाकार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी माननिय भाकरे मॅडम जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांनी अध्यास्थी अधिकारी म्हणून, अकोला जिल्हा विद्युत मंडळ तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्या अकोला या पतसंस्थेच्या संचालक पदाधिकारी यांची निवड झाल्याचे असे घोषित केले.यावेळी नवनिर्वाचित संचालक पदाधिकार्यांचा पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्हा (संघटनेच्या) वतीने जिल्हा अध्यक्ष प्रविण भाऊ चोपडे व जिल्हा सरचिटणीस सुनिल झेड गवई यांच्या वतीने, अकोला जिल्हा विद्युत मंडळ तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्या अकोला चे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल सोळंके,उपाध्यक्ष श्रीमती वंदनाताई उबहरडे,मानद सचिव कीशोर करडे,खजिनदार निलेश चहाकार या सर्व संचालकांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिवाय जय बजरंग व्यायामशाळा मोठी उमरी या संस्थेचे अध्यक्ष प्रदिप सोनोने व सचिव मंगेश टापरे यांनी सुध्दा नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल सोळंके यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था अकोलाचे अध्यक्ष प्रा. अरुण खिरडकर व तज्ञ संचालक सुनिल झेड गवई यांनी सुध्दा संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल सोळंके ,उपाध्यक्ष वंदनाताई उबहरडे,मानद सचिव कीशोर करडे,खजिनदार निलेश चहाकार,संजय खर्डे , पारीसे ,गावंडे ,जाधव ,दहिमॅडम, गाडगे मॅडम यांनी सुद्धा संचालकांचा सत्कार केला.

तसेच महाराष्ट्र राज्य वीज तांत्रीक कामगार संघटनेचे झोन अध्यक्ष. व .केंद्रिय कार्यकारणी ईफीएफ सदस्य जावेद खान मेहमूद खान, एच टी वसु. महापारेषणचे. रविन्द्रजी चौखडे नागपूर, कार्यकारणी सदस्य सचिन केतकर ,अकोला झोन अध्यक्ष महेश तपीले. झोन सहसचिव अंनत पालखेडे,शहर अध्यक्ष ललीत पाचपोर,निलेश वाघ, सागर कोकाटे,प्रतिक चंद्रगिरी, सुधीर शिंदे, प्रतिक नवले, प्रदीप वाघ. यांच्या हस्ते अनिलजी सोळंके नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला व नवनिर्वाचित संचालकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्यात . या नवनिर्वाचित संचालकाच्या निवडी करीता महाराष्ट्र राज्य वीज तांत्रीक कामगार संघटनेचे मुख्य सल्लागार नागोराव जी मंगर ,जावेद खान मेहमूद खान, एच टी वसु , मस्के , उगळे , एडपीले हे उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ चतुर्थी श्रेणी सहकारी पतसंस्था मर्या अकोला चे संचालक मंडळ यांनी विधुत मंडळ तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था तसेच संस्थेचे कर्मचारी प्रमोद शुक्ला,सुनिल झेड गवई , सपकाळ,भुषणजी सुळे यांनी सुद्धा नवनिर्वाचितांचा सत्कार केला. याप्रसंगी अनिल सोळंके यांनी आपल्या संभाषणातून बोलतांना ," पतसंस्थेचे सभासद यांना जास्तीत जास्त कर्ज वाटप, नवीन सभासद नोंदणी,जमा ठेवी घेणे,थकीत कर्ज वसुली करणे व सभासद यांना कशा प्रकारे जास्तीत जास्त वार्षिक लाभ देता येईल आपली पतसंस्था कशा प्रकारे जास्तित जास्त विकसीत करता येईल याकडे प्राधान्याने लक्ष देणार." असल्याचे सांगीतले. अकोला जिल्हा मध्ये महाराष्ट्र राज्य वीज तांत्रीक कामगार संघटनेचे सय्यद जहिरोद्दीन, अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही कटीबंद्ध राहु.असे आपल्या भाषणात सांगितले. तसेच याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल सोळंके यांनी संस्थेचे मावळते अध्यक्ष नागोराव मगर, तिडके यांना सत्कार समारंभ घेऊन त्यांना निरोप देण्यात आला. तर नियमानुसार मावळते अध्यक्ष नागोरावजी मगर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष अनिलजी सोळंके साहेब यांना रीतसर पदभार सुपूर्द केला. नागोराव मगर यांनी निरोप घेतांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या महत्वपूर्ण निवडणूक बैठकीचे सुत्र संचालन सुनिल झेड गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद जी शुक्ला यांनी केले. सदर निवडणूक कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कर्मचारी प्रमोद शुक्ला सुनिल झेड गवई,अशोक सपकाळ. भुषणजी सुळे.. व सर्व सभासद यांनी अथक परीश्रम घेतले असे वृत्त प्राप्त झाल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....