कारंजा : दिव्यांगाकरीता केन्द्र शासनाच्या भागीदारीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून स्व . संजय गांधी निराधार योजना चालवील्या जाते. त्या अंतर्गत दिव्यांग, विधवा, वयोवृद्धांना श्रावण बाळ, इंदिरा गांधी व संजय गांधी यांच्या नावे अनुदान म्हणजेच तुटपुंजे का होईना पण अर्थसहाय्य दिल्या जात असते. परंतु गेल्या माहे सप्टेंबर महिन्यात जुलै - ऑगस्टचे अनुदान वितरित करतांना श्रावण बाळ व इंदिरा गांधी योजने अंतर्गत वयोवृद्धांना आणि विधवा महिलांना प्रत्येकी दोन दोन हजार रुपये वितरीत करण्यात आले परंतु दिव्यांगाच्या खात्यावर केवळ एकच हजार पाठविण्यात आलेत त्यामुळे दिव्यांग व्यक्तिंची घोर निराशा झाली. अशी तक्रार इम्तियाजबी अफजलशहा, नाना देशमुख, हसन पटेल, कासम मुन्निवाले, इत्यादी मंडळीनी केली आहे. तरी आता तहसिलदार महोदयांनी दिव्यांगा प्रती सहानुभूती ठेवून निदान दिपावली पूर्वी तरी दिव्यांगाना माहे ऑगष्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर अशा तिन महिन्याचे पूर्ण अर्थ सहाय्य देण्याची मागणी संबंधिताकडून होत आहे. असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदे कडून प्रसारमाध्यमाकडे देण्यात आले आहे.