कारंजा : विदर्भाची पंढरी श्री संत गजानन महाराज संस्थानच्या मानवसेवेचे ब्रिद आणि निष्काम सेवा धर्माची परंपरा कायम राखीत,देवधर्माचे धार्मिक सण उत्सव साजरे करतांना, लोक सहभागा मधून धार्मिकते सोबतच आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबविणारे एकमेव संस्थान म्हणून, उंबर्डा बाजार येथील श्री समर्थ गजानन महाराज संस्थानचा विदर्भात नावलौकिक असून उंबर्डा बाजार हे प्रति शेगाव म्हणूनही ओळखले जाते. या संस्थानच्या प्रगटदिन कार्यक्रमा बाबत अधिक वृत्त असे की,कारंजा पंचक्रोशीतील नेर मार्गावरील उंबर्डा बाजार येथे,गेल्या ५१ वर्षाच्या परंपरेनुसार श्री समर्थ गजानन महाराज संस्थान उंबर्डा बाजार येथे दरवर्षी प्रमाणे दि ६ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी पर्यत सकाळी ०९:००१२:००० व दुपारी ३:०० ते ०५:०० वाजेपर्यंत दोन सत्रामध्ये, परमपूज्य महामंडलेश्वर श्री श्री १००८ श्री ईश्वरानंद ब्रम्हचारीजी ( श्री महर्षी उत्तम स्वामीजी महाराज ) यांचे संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आलेले असून, त्या निमित्ताने दररोज सकाळी काकडा सायंकाळी हरीपाठ व रात्री सुप्रसिद्ध संतमंडळी द्वारे किर्तनाचे आयोजन करण्यात आलेले असून, सप्ताहामध्ये दि ६ फेब्रु. हभप शिवाजी महाराज बावसकर, जळगाव जामोद ; दि ७ फेब्रु. हभप प्रसाद महाराज रोहिनेकर परभणी ; दि .८ फेब्रु. हभप शिवलिला ताई पाटील बार्शी ( सोलापूर ), दि . ९ फेब्रु. हभप मोहन महाराज शेलार, आळंदी दि १० फेब्रु. हभप रामचंद्र महाराज काळबांडे, जळगाव .दि ११ फेब्रु. हभप मुलताई चालक व हभप शिवानी ताई चालक पुणे दि १२ फेब्रु. हभप प्रविण महाराज सातपुते पुसद,दि . १३ फेब्रु. दुपारी हभप प्रविण महाराज सातपुते यांचे दहीकाल्याचे किर्तन ; सायंकाळी हभप मंदार महाराज शास्त्री आदीं संत मंडळीकडून किर्तन सेवेतून समाज प्रबोधन होणार आहे. सदर्हू कार्यक्रमाला प्रामुख्याने खासदार भावना ताई गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, जि प अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे, जि प सदस्या वनिताताई देवरे, प स सदस्या लक्ष्मिबाई हळदे, युवा सरपंच राज चौधरी यांची उपस्थिती राहणार असून ; ग्रंथपूजन, कारंजाचे माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, सुनिल पाटील धाबेकर, माजी कारंजा नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, चंद्रकांत जटाळ ( विशाखापट्टणम ) यांचे हस्ते होईल यावेळी तहसिलदार धिरज मांजरे, ग्रामिण पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक गजानन धंदर, गटविकास अधिकारी शालिकराव पडघाण आदींचा सत्कार सुध्दा केल्या जाईल. तसेच श्रींच्या प्रगटदिनाला सोमवारी दि १३ फेब्रु रोजी सकाळी पुरोहित ओमजी ठाकुर यांच्या हस्ते सामुहिक होमहवन विधी पार पडेल . सकाळी ०७ ते १०:०० पर्यंत श्रींची पालखी नगर परिक्रमा करून येईल व दहीहंडी काल्यानंतर दुपारी ०१:०० वाजता पंचक्रोशितील लाखो भाविकांकरीता भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून दुसरे दिवशी दि १४ फेब्रु रोजी उंबर्डा बाजार ते शेगाव करीता हजारो वारकरी, भजनी मंडळ, दिंड्या घेऊन पालखी पदयात्रा प्रस्थान करणार असल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेकडे श्री समर्थ गजानन महाराज संस्थान व गावकरी मंडळी कडून देण्यात आले आहे. तरी सदरहू कार्यक्रम आणि त्यानिमित्त आयोजीत भव्य यात्रोत्सवाचा भावकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे .