कारंजा (लाड) : "स्थानिक कारंजा नगर पालिकेत सध्या प्रशासकिय कार्यभार सुरु आहे.व त्यामुळे सर्व अधिकार प्रशासकिय अधिकारी या नात्याने मुख्याधिकारी सरांकडेच आहेत.त्यामुळे,कारंजा येथील,कलावंताची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली सांस्कृतिक नाट्य सभागृहाची मागणी तात्काळ मान्य करीत,आपल्या अखत्यारीत येत असलेला कोणताही भूखंड,सांस्कृतिक नाट्यगृहाकरीता तात्काळ उपलब्ध करून द्यावा."अशी रितसर मागणी कारंजा येथील अखिल भारतिय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ मुंबईचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सदस्य धडाडीचे प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर कव्हळ्कर यांच्या नेतृत्वात कारंजा येथील कलावंताच्या सर्वपक्षिय संघटनांनी मुख्याधिकारी दिपक मोरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना केली आहे.कारंजा ही नाट्य,चित्रपट निर्मात्याची खाण असलेली सांस्कृतिक नगरी असून,येथे शरद व्याख्यानमाला, डॉ बाबासाहेब आंबेडकर व्याखानमाला दरवर्षी चालतात. शिवाय ह्या शैक्षणिक,सांस्कृतिक, आध्यात्मिक नगरी मध्ये वर्षभर राष्ट्रिय जनजागृतीचे कार्यक्रम चालत असतात.शिवाय या नगरीला मोठमोठे राजकिय नेते, केन्द्रिय मंत्री,मुख्यमंत्री भेटी देत असतात.परंतु त्यांना जनतेशी थेट संवाद साधण्याकरीता येथे एखादे सांस्कृतिक सभागृह आणि व्यासपिठच उपलब्ध नाही. खरेतर कारंजा येथील राजकिय नेत्यांकरीता ही लाजीरवाणी गोष्ट आहे.त्यामुळे सभागृहाची मागणी तात्काळ पूर्ण होणे जरूरीचे असल्यामुळे,कारंजा येथील अखिल भारतिय मराठी नाट्य परिषद,विदर्भ लोककलावंत संघटना,आदर्श जयभारत सेवाभावी संस्था,अष्टविनायक कल्चरल ग्रुप,अविष्कार बहुउद्देशिय संस्था, जिव्हाळा परिवार यांनी प्रामुख्याने एकत्र येऊन सांस्कृतिक नाट्यगृहाची मागणी लावून धरलेली आहे. त्याच अनुषंगाने सोमवार दि.१२ जून रोजी कारंजा येथील माजी नगरसेवक प्रसन्ना पळसकर, नंदकिशोर कव्हळकर आणि पत्रकार संजय कडोळे यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी दिपक मोरे यांची भेट घेऊन, नाट्यसभागृहाकरीता भूखंडाची मागणी लावून धरलेली आहे.