अकोला : वर्धा येथील दैनिक सहासीकचे संपादक आमचे पत्रकार बांधव श्री रविंद्र कोटंबकर यांना वर्धा जवळील पवनार जवळ त्यांच्या वाहनाला अडवून त्यांचेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. लोकशाहीमध्ये कायद्यांच्या राज्यात समाजाकरीता लढणार्या पत्रकारावर झालेल्या या हल्ला प्रकरणातील हल्लेखोरांना तात्काळ अटक त्यांचेवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कडक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख व विदर्भ विभागीय संघटन तथा संपकृ प्रमुख व साप्ता. विश्वप्रभातचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी किशोर मुटे यांनी केली असून पत्रकारांवरील हल्ल्याचा तिव्र शब्दात निषेध केला आहे.
सामाजिक जागृती आणि समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनैतिक अपप्रवृत्तींना बातम्यांद्वारे चव्हाट्यावर आणणार्या समाजशील पत्रकारांवर होणारे हल्ले ही पत्रकारीता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दंडेलीने केली जाणारी दडपगिरी आहे. पोलिस प्रशासनाने अशा गुंडप्रवृत्तींना वठणीवर आणण्यासाठी तातडीने कडक कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक व उपविभागीय अधिकारी वर्धा यांना पाठविलेल्या पत्रातून करण्यात आली आहे.