कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : कारंजा येथील चिमुकल्यांच्या उत्कृष्ट शिक्षण व संस्काराच्या दृष्टिने सुप्रसिध्द असलेल्या,श्रीमती सितादेवी गोलेच्छा कॉन्हेन्ट कारंजा येथे प्रमुख मार्गदर्शक आणि कारंजा नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा पक्षाचे भिष्माचार्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, जेठूसेठ उपाख्य नरेंद्र गोलेच्छा यांच्या मार्गदर्शनाने,भारतिय स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाचे आणि स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिना निमित्ताने,दि. 15 ऑगष्ट रोजी, चिमुकल्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानिमित्त, यावेळी स्वातंत्र्य दिन समारोहाचे अध्यक्ष म्हणून,अखिल भारतिय मराठी नाट्य परिषदेचे मुंबई नियामक मंडळ सदस्य तथा विदर्भ लोककलावंत संघटनेचे कार्याध्यक्ष- नंदकिशोर कव्हळकर यांना बहुमान देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष भाजपा भिष्माचार्य नरेंद्रजी गोलेच्छा ,डॉ सचिन राठोड, संचालक विनित गोलेच्छा आणि माजी नगराध्यक्षा सौ. निशाताई विनित गोले च्छा ह्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सर्वप्रथम देशभक्त महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन हारार्पण व कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर कव्हळकर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले.चिमुकल्यांनी आपल्या सुमधूर गायनातून राष्ट्रगीत,राज्यगीत सादर केल्यानंतर रिलायन्स फाऊंडेशनच्या चित्रकला स्पर्धेतील गुणवत्ता प्राप्त चिमुकल्या विद्यार्थांचा सत्कार घेण्यात आला.नंतर विद्यार्थ्यानी उत्कृष्ट असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शिक्षकवृंदानी अथक परिश्रम घेतल्याचे दिसून येत होते.याप्रसंगी शिक्षकवृंदांसह पालक वर्गाची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला स्वाती खोडे मॅडम,कुलश्री सावजी,छाया बेंद्रे,शितल राऊत,वैशाली राऊत,राधिका आसावा,अर्पिता कु -हे,भाग्यश्री वाघमारे,वैशाली परकोटे,सरिता राठोड,राजकुमारी अहेरवार,ममता चव्हाण आदींची उपस्थिती होती.असे वृत्त श्रीमती सितादेवी गोलेच्छा कॉन्व्हेन्ट कडून महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला कळविण्यात आल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांचेकडून कळविण्यात आले आहे.