कारंजा : कारंजा येथील कार्यतत्पर सामाजिक व राजकिय कार्यकर्ते अरुण बिकड यांची, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्या तथा वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय महिला खासदार भावनाताई गवळी तथा जिल्हा प्रमुख विजय खानझोडे यांनी नियुक्तीपत्र देऊन अरुण बिकड यांची कारंजा शहरप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.यावेळेस स्वतः खा. भावनाताई गवळी आणि जिल्हाप्रमुख विजय खानझोडे यांनी अरुण बिकड यांना नियुक्तीपत्र देवून त्यांचे अभिनंदन केले. अरुण बिकड यांच्यातिल कार्यतत्परता मनमिळाऊ स्वभाव आणि संघटन कौशल्यामुळे त्यांचेवर विश्वास ठेवून जिल्हा प्रमुखांनी त्यांचेवर कारंजा शहरात पक्षसंघटन वाढवीण्याची जबाबदारी सोपविल्याचे वृत्त संजय कडोळे यांना प्राप्त झाले आहे. नियुक्त पत्र प्रदान करते वेळी मनोज पाटील दहातोंडे,तालुका प्रमुख मंगेश पाटील मूंदे व बाळासाहेबाची शिवसेना पक्षाचे असंख्य शिवसैनिक हजर होते.