तळोधी (बा.) (चंद्रपूर): तळोधी येथून जवळच असलेल्या नांदेड झाडबोरी नवरगाव रस्त्यावर दुचाकी आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात अलीम रतन शेख (२२, रा. जाम) हा युवक जागीच ठार झाला. तर दुचाकीचालक समशेद झोनू शेख (रा. नांदेड) हा किरकोळ जखमी झाला. नांदेड येथील आपल्या नातेवाइकाकडील कार्यक्रमासाठी अलीम शेख हा आला होता.
नवरगाव येथे काही साहित्य घेऊन परत येत असताना झाडबोरीजवळील नांदेड पाणीपुरवठा टाकीजवळ हा अपघात झाला.
एम. एच. ३४- एल- ४९२९ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. सदर ट्रॅक्टर ईश्वर गहाणे (रा. नवरगाव) यांच्या मालकीचा असल्याची माहिती आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार बी. आर. शेंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.