चंद्रपूर : जिल्ह्यात ताडोबासारखा जगप्रसिध्द व्याघ्र अभयारण्य आहे. त्यामुळे बाहेरून पर्यटक वाघांच्या दर्शनासाठी येत असतात. याच व्याघ्रकल्पाबाहेरही वाघांचे दर्शन स्थानिक नागरिकांना नित्याची बाब झाली आहे. कधी गावात तर कधी गावाशेजारी, कधी जंगलात तर कधी शेतशिवारात वाघांचे हमखास दर्शन नागरिक शेतकरी शेतमजूर गुराख्यांना होतच असते. त्यामुळेच वाघ आणि मानव यांच्या संघर्ष वाढत आहे. एकापेक्षा एक अशा चविष्ठ घटना वाघांच्या चंद्रपूर जिल्ह्यात घडत असतात. अशीच एक वाघ आणि महिलेची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात नवरगाव परिसरात आज सोमवारी (8 ऑगस्ट) ला उघडकीस आली आहे. शेळ्या घेऊन गेलेल्या महिलेच्या समोर अचानक वाघोबा अतरले आणि महिलेची पाचावर धारण बसली. जिव वाचविण्याठी महिलेने नामी युक्ती शोधून चक्क नाल्यातील पाण्यात उडी घेऊन जिव वाचविला. महिलेचा जीव वाचला पण एका शेळीला जिव गमवावा लागला.
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव परिसरातील खांडला येथील 30 वर्षीय मीनाक्षी विजय धुर्वे निवासी आहे. तिच्याकडे घरी दोन शेळ्या आहेत. आज सोमवारी रत्नापूर बिटातील खांडला परिसरातील जंगलात शेळ्या इतर कळपासोबत चारायला जंगलात घेऊन गेली होती. नाल्याच्या काठावर श्शेळ्या घेऊन जात असताना मागून पट्टेदार वाघ तिचा पाठलाग करीत होता. मागे वाघ आपला पाठलाग करीत असल्याची भनक तिला लागली. चक्क मृत्यूच मागे असल्याने तिची पाचावरण धारण बसली. पुढे शेळ्या आणि मागे वाघ असा प्रसंग सुरू असताना ती बराच वेळ चालत राहिली. त्याच परिसरात एक नाला पडला. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नाल्याला भरभरून पाणी वाहत आहे. वाघ मागे तिचा पाठलाग करीत असल्याने महिलेला काय करावे काय नाही? सुचेनासे झाले. वाघ पाठलाग करीत असल्याने ना पळता येत ना मागे वळून पाहता येत होते. मधात नाला असलयाने तिकडेही जिवाची भिती तर मागे पाठलाग करीत असलेल्या वाघाची भिती. जिवाच्या भितीने ती अस्वस्थ झाली होती. जिव वाचविण्यासाठी मनात विविध तर्क वितर्क लावले जात होते. तेवढ्यात तिला नामी युक्ती सुचली. नाल्यात असलेल्या पाण्यात तिने थेट उडी घेतली. पोहून एका थडीवरून दुसऱ्या थडीवर ती सुखरूप पोहचली. पाण्यातून जिव वाचवून ती बाहेर आली. मात्र वाघाने थेट शेळीवर हल्ला केला. एकीचा जिव गेला तर दुसरी शेळी जखमी झाली. महिलेचा जिव वाचला मात्र तिच्या एका शेळीचा जीव गेला.
त्यानंतर नाल्याच्या दुसऱ्या काठावर निघून काही अंतरावर असलेल्या गुराख्यांना हा थरारक प्रकार सांगितला. घटनेची माहिती गावात पसरली. नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांच येण्याने त्या परिसरातून काढता पाय घेतला. त्या महिलेला गुराख्यांनी गावात आणून कुटूंबियांच्या स्वाधीन केले. शौर्य आणि साहसी वृत्तीने त्या महिलेला वाघाला चकमा देण्यात देता आला. तिच्या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.