कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे):- पंचक्रोशीतील डोंगर माथ्या मधील निसर्गरम्य ठिकाणी, महान तपस्वी सिद्धगुरू श्री अवधूत महाराजांचे,जुन्या दगडी बांधणीचे प्राचिन मंदिर असून,या ठिकाणी दर बुधवारी यात्रा रहात असून, कारंजा, दारव्हा, नेर आणि पंचक्रोशीतील सर्वच जिल्हयातील भाविकांची मांदियाळी बघायला मिळते. सदहू मंदिर हे हातोला गावापासून तिन कि.मी.लांब निर्जन ठिकाणी असून,येथे सदैव वन्य प्राण्याचा वावर असतो.गेल्या अनेक वर्षापासून या मंदिरावर मंदिराचे पुजारी व सेवाधारी म्हणून हभप शेषराव महाराज कडू हे सेवारत होते. एकांतात असलेल्या या मंदिरात ते ऊन असो वा पाऊस. रात्र असो वा दिवस.परंतू अखंडपणे सेवा देत होते. परंतु अचानक ते ब्रम्हलिन झाले.ही वार्ता पंचक्रोशीतील गावोगावी पसरताच हातोला परिसरातील श्री अवधूत बाबा यांचे भक्त मोठ्या संख्येने गोळा झालेत.वारकरी वृंदासह,त्यांची अंतिम मिरवणूक मंदिर परिसरात काढण्यात आली.व हजारो भाविकांच्या साक्षीने त्यांना भावपुष्पे अर्पण करीत मंदिर परिसरातच समाधी देण्यात आली.या समाधी सोहळ्याला बालयोगी संत प्रदिप महाराज हातोला,संत ज्ञानेश्वर महाराज शेगाव,संत नितीन महाराज विरगव्हाण,हभप अजाब महाराज ढळे,हातोला येथील वारकरी भजनी मंडळ, दिघी येथील माहिला मंडळ व पंचक्रोशीतील कारंजा,नेर,दारव्हा तालुक्यातील भाविक हजर होते.यावेळी कडू महाराजांना अश्रूपूर्ण नयनांनी मौन्य श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.