सज्जनव्यक्ती नेहमी तळागाळातील बहुजनांच्या दारिद्री घरात जन्माला आल्याची अनेक उदाहरणे आहेत. यामध्ये संत गोरोबा काका, संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर या संतश्रेष्ठींची, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या घटनाकाराचे, बाबा मोहोड, सिंधुताई सपकाळ आदी महापुरुषांची उदाहरणे सांगता येतील. यांच्या समाजसेवी कार्याचा बाऊ करून अनेक प्रस्थापितांनी यांचा छळ केल्याचे वास्तव प्रचलित आहे. दि.१५ ऑगष्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला . परंतु परिस्थिती आजही जैसे थे आहे. आजही उच्चवर्णीय प्रस्थापित समाज स्वतःचे काळे धंदे लपविण्याकरीता आणि स्वतःचे वर्चस्व अबाधित ठेवण्या करीता नवोदीत बहुजनांचा येनतेन मार्गाने छळ करीत आहे. एखादा तळागाळातील व्यक्ती समाजा करीता काहीतरी करतो आहे. बहुजनांना एकत्र जोडतो आहे. त्यांच्या भल्यासाठी काहीतरी करू इच्छितो आहे. हे या प्रस्थापितांना सहन होणेच शक्य नसते. मग हे अशा समाजसेवकाचे अवसान गळावे म्हणून नाना क्ल्युप्त्या लढवीतात . त्यामध्ये मग समाजसेवकाचे सभोवती असणारे त्याच्या मित्रमंडळींचे वलय तोडणे, विनाकारण त्याच्या बदनाम्या करणे असे प्रकार सुरू होतात. आजकाल विज्ञान युगात समाज माध्यमाचा ( व्हॉटस्एपप ग्रुप ) प्रभाव वाढत असतांना समाज माध्यमांवर सुद्धा यांचे चाळे सुरू होतात. परंतु यांना हे कळत नाही की, सामान्य जनता आता खुळी राहीलेली नाही. तुमच्या निच पातळीवरील खोट्या टिकेची कल्पना सामान्य जनतेला केव्हाच आलेली असते आणि म्हणून ते तुमची लायकी ओळखून असतात. माणसाने माणसाशी माणूसकीने वागले पाहीजे एवढे तारतम्य ज्या व्यक्तीला नसेल तो माणूस समोरची व्यक्ती कोण ? कशी ? याचा विचार न करता जेव्हा सैरभर वागत सुटते तेव्हा सामान्य जनता सुद्धा अशा व्यक्तीचे "दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे" असल्याचे चटकन ओळखून घेत असते. संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अंभगातून सांगीतलेच आहे की, " निंदकाचे घर असावे शेजारी तेणे मुक्ती चारी साधिलेल्या !" याप्रमाणे मग सज्जन व्यक्तिसुद्धा या व्यक्तिकडे फारसे लक्ष्य न देता आपली वाटचाल सुरु ठेवीत असतात. मग मात्र एक दिवस असा उगवतो की, यांना स्वतःचाच पश्चाताप झाल्याशिवाय रहात नाही.