वाशिम :राष्ट्रीय उद्योग इंडिया वाशिम जिल्हा कार्यकारणी घोषित.
राष्ट्रीय उद्योग इंडियाची कार्यकारणी बैठक नुकतीच पार पडली असता यामध्ये मयूर राऊत यांची जिल्हाध्यक्षपदी निवड तर महिला जिल्हाध्यक्षपदी शारदा भुयार यांची निवड करण्यात आली आणि जिल्हा उपाध्यक्षपदी सौ गीता काटकर यांची निवड करण्यात आली व जिल्हा सचिव पदी कुमारी राधिका मडावी यांची निवड करण्यात आली व तसेच अर्चना मडावी, विमल बारबोले, कविता सावळे, सुलोचना काळबांडे, मंगला वठे, पंचफुला कोकाटे, मंदा चौधरी, उषाबाई ढाकूरकर, सविता उईके, संतोष रोकडे. यांची सदस्य पदी निवड करण्यात आली वरील सर्वांचे निवड राष्ट्रीय उद्योग इंडियाचे विदर्भ सचिव श्री नागेश भाऊ भोजने यांनी केली.
आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या संकल्पनेतून "गाव तेथे उद्योग घर तिथे रोजगार" हे राष्ट्रीय उद्योग इंडियाचे उद्दिष्ट आहे. जिल्हाध्यक्ष मयूर राऊत यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेकडे कळविल्याचे वृत्त सचिव विजय पाटील खंडार यांनी कळविले आहे.