कारंजा (लाड) : महानगर पालिका,नगर पालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत इ. स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या विकासनिधी मधून 5% दिव्यांग सहाय्य निधी म्हणून दिव्यांगाना वितरीत करण्याचे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत.परंतु स्थानिक स्वराज्य संस्थाकडे हा एकूण निधी किती रुपये प्राप्त होतो ? व 5% प्रमाणे दिव्यांगा सहाय्या करीता किती रुपये निधी वेगळा काढून वितरीत केल्या जातो ? हे स्थानिक मुख्याधिकारी यांनी जाहीर करणे अत्यावश्यक आहे.तसेच चालू आर्थिक वर्षाचा निधी दिव्यांगाना लवकरात लवकर वितरीत करणे अत्यावश्यक असल्याची चर्चा असून, संबधीत कारंजा नगर पालिकेने दिव्यांग सहाय्य निधीचे वितरण दिव्यांगाना लवकरात लवकर करण्यात यावे याकरीता महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष सन्माननिय.बच्चुभाऊ कडू यांनी संबंधितांना आदेश देण्याची मागणी कारंजा येथील दिव्यांगांनी लावून धरली आहे.