कारंजा तालुक्यातील पिंपरी मोखड येथे सावरकर कुटुंब दरवर्षी निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यस्मरण आणि विविध प्रकारचे लोकोपयोगी समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करतात या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेले निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत समाज प्रबोधनकार पी.एस.खंदारे यांचा अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित सप्रयोग व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, गाडगेबाबा यांच्या जिवन चरित्र व समाज अंधश्रद्धा मुक्त व्हावा म्हणून विविध प्रकारचे चमत्कार जसे की पाण्यावर बिना राॅकेल व बगरवातीचा दिवा पेटवणे,पाण्याचा प्रसाद तयार करणे,भुत, भानामती,करणी आदी विषयांवर चमत्कार सादरीकरण करून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन मोखड पिंप्री येथील संतोष सावरकर यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ॲड.विनोद आठोरे यांनी केले व संगीताची साथ सहयोग भजनी मंडळीनी दिला मोखड पिंप्री येथील महिला व बालकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.असे वृत्त अंधश्रध्दा निर्मूलन समिती कारंजाचे सभासद संजय कडोळे यांनी कळवीले आहे.