कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : ओमडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील कुमारी नीलिमा सुधाकर चव्हाण वय अंदाजे 24 वर्ष ह्या दापोली येथील स्टेट बँकेमध्ये कंत्राटी कामगार म्हणून नोकरीला होत्या. दि.29 ऑगष्ट 2023 रोजी त्या ड्युटीवरून घरी परत येत असताना त्यांचे अपहरण करण्यात आले. व त्यांच्यावर अत्याचार करून त्यांच्या डोक्यावरील केस काढून चेहरा विद्रूप करून त्यांचा खून करण्यात आला. त्यांचा मृत्यू देह-दाभोळ खाडी मध्ये दि.1 ऑगष्ट 2023 रोजी भयावह अवस्थेत आढळला आहे.नाभिक समाजातील या घटनेचे तिव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असून,जागोजागी या गंभीर घटनेबद्दल दुःख व्यक्त करीत क्रूरकर्म्याचा निषेध करण्यात येत आहे.अत्यंत गरीब कुटुंबातील ह्या मुलीचा खून करणाऱ्याला तात्काळ अटक करावी अन्यथा नाभीक समाज संघटना कारंजा रस्त्यावर उतरेल व होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील अशा प्रकारचे निवेदन तहसीलदार यांचे मार्फत नुकतेच मुख्यमंत्री व शासनाला देण्यात आले आहे. निवेदन देते वेळी कारंजा येथील नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर घोडसाड ,उपाध्यक्ष श्रीकांत मोरस्कर ,कोषाध्यक्ष दिलीप मर्दाने ,सह कोषाध्यक्ष दीपक खारटकर, सचिव डॉ सुनील गौंड सदस्य शाम तायडे ,सुधीर घोडसाड , अमोल घोडसाड, माजी अध्यक्ष प्रकाश कवळेकर वाशिम जिल्हा सचिव अरुण घोडसाड ,माजी सचिव निलेश सोनोलकर , राजू वाघमारे हिम्मत वाघमारे,दिनेश आगाशे, विसरकर, प्रमोद घोडसाड इत्यादी उपस्थित होते असे वृत्त अरुण घोडसाड यांनी कळवीले आहे.