तालुक्यात रविवार दिनांक 15 ऑक्टोबरला नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत असून शहरातच नव्हे तर ग्रामीण क्षेत्रातही या नवरात्री उत्सवासाठी अनेक सामाजिक मंडळी, सामाजिक संस्था, बचत गट ,महिला संघटन यांची जय्यत तयारी सुरू असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ पोलीस प्रशासनांनी उभे केले आहे.
मागील अनेक वर्षापासून नवरात्र उत्सवाच्या तयारीसाठी सामाजिक मंडळी ,महिला संघटन यांचा विशेष सहभाग या नवरात्र उत्सवात असतो समाजातील युवा पिढीही आता या नवरात्री उत्सवाकडे आकर्षित झाली असून शहरांमध्ये विविध मंडळातर्फे गरबा नृत्य ,भजन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा ,दांडिया यासारखे विविध प्रकारचे आयोजन मंडळातर्फे करण्यात येत असतात ,यामध्ये मुले- मुली हिरेरीने मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असल्यामुळे हे दहा दिवस प्रशासनासाठी मात्र आव्हानात्मक, संवेदेशील असणार आहे , तालुक्यामध्ये जवळपास 240 दुर्गा उत्सव मंडळ असून त्यातही ग्रामीण भागात म्हणजेच 81 ग्रामपंचायत असल्याने या दुर्गा उत्सव मंडळाकडून मंडपाची बांधणी पताका स्वच्छतेची नियोजन करण्यात येत आहे ,दुर्गा उत्सव 2003 या सणासाठी पोलीस विभागाद्वारे शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही शांतता व सुव्यवस्था तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कामाला लागलेली आहे यामध्ये शांतता कमिटीची ही जातीने लक्ष राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक अमोल कचोरे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले, तसेच दोन ते तीन पोलीस कर्मचारी या संबंधित मंडळावर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले, वरोरा शहरातील पोलीस स्टेशन येथे जवळपास 93 कर्मचारी असून यातही 30 टक्के पोलीस महिलांचा सहभाग असल्यामुळे पोलीस प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचे आव्हान उभे राहिलेले आहे ,यासाठीच म्हणून 74 होमगार्ड यांचाही या उत्सवा दरम्यान सहभाग घेण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला असून यात कोणती ही प्रकारची अशांतता निर्माण होणार नाही याचे परीपूर्ण नियोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल कचोरे यांनी दिली.