अकोला --व्यक्तिमत्व विकासात वाचनाचे अपार महत्व आहे. म्हणुन विद्यार्थ्यांनी वाचन कौशल्य आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन हिन्दीभाषा साहित्यिक प्राचार्य डॉ. रामप्रकाश वर्मा यांनी केले.
वाचन संकल्प अभियानांतर्गत बाबूजी देशमुख वाचनालयाच्या वतीने आयोजित वाचन कौशल्य कार्यशाळेच्या उद्- घाटन प्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्रा होते. स्तंभलेखक प्रा. मोहन खडसे व भाषातज्ज्ञ प्रा. बबनराव कानकिराड यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाचनाने बहुश्रृतता प्राप्त होऊन दृष्टी व्यापक होते. वाचनाने कल्पनाशक्तीचा विकास होतो. वाचन कौशल्याशी संबंधित इतर कौशल्य कौशल्यांचा विकास होतो. संस्कृती आणि परंपरेचे ज्ञान होते असे प्रतिपादन प्रा. बबनराव कानकिरड यांनी केले.
व्यक्तिमत्व विकासात वाचन हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या वाचन प्रक्रियेत शब्द बोध, वाचन दिशा, पुनरुदृष्टीक्षेप, दृष्टीचा आवाका, शब्द उच्चारण, आकलन ,आस्वादन, शब्द ग्रहण ,शब्द संग्रह हे घटक आत्मसात करणे आपल्या सर्वंकष विकासाचा पाया असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ.मोहन खडसे यांनी केले.
सर्पमित्र बाळ काळणे, प्रशांत लोडम, ग्रंथपाल सुरेश टेके,सहाय्यक ग्रंथपाल सतीश डगवाले,जुगलकिशोर शिरसाट ,नितीन कदम, स्वप्नील ताथोड, सुनिल मिश्रा यांच्यासह शालेय, महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची या कार्यशाळेत मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....