नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती चा निकाल लागला असून यामध्ये
श्री किसनलाल नथमल गोयनका कला व वाणिज्य महाविद्यालय कारंजा लाड चा इयत्ता बारावीचा कला शाखेचा निकाल ६३.१५ टक्के लागला असून या मध्ये कारंजा गवळीपुर्यातील तीन विद्यार्थिनींनी कॉलेज मधून प्रथम समरीन सुभान लालू वाले ७८.५० टक्के, द्वितीय तमन्ना अफजल रायलीवाले ७५.१७ टक्के व तृतीय समरीन हुसेन कालीवाले ७१.१७ टक्के अंक घेवून प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा बहुमान मिळविला आहे.ह्या यश संपादन करणाऱ्या तिन्ही विद्यार्थिनीचे महाराष्ट्र गवळी समाज संघटने तर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.