मणिपूरमध्ये हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पुन्हा एकदा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील थौबलमध्ये चार जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हिंसाचारात अनेक जण जखमीही झाले आहेत. यानंतर खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली.
थौबल जिल्ह्यातील स्थानिकांनी दावा केला की लोकांचा एक गट, ज्यांची अद्याप ओळख पटलेली नाही, ते खंडणीसाठी स्वयंचलित शस्त्रे घेऊन आले होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी एका व्हिडिओ संदेशात हिंसाचाराचा निषेध केला आणि लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले निरपराध लोकांच्या हत्येबद्दल मी अत्यंत दु:ख व्यक्त करतो. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस पथके तैनात केली आहेत. मी जिथे घटना घडली तेथील रहिवाशांना आवाहन करतो की, गुन्हेगारांना पकडण्यात सरकारला मदत करा. मी वचन देतो की सरकार कायद्यानुसार न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.