अकोला : नुकतेच माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीने अकोला येथे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले असून,
आ.विजयाताई मारोतकर व आ. देविकाताई देशमुख या प्रतिभावंत लेखिकांच्या संयोजनातून साकारलेल्या या संमेलनात कारंजा येथील विदर्भ लेखिकांनी या संधीचा पुरेपूर लाभ घेत कारंजानगरीचे नाव राज्यात एकवार पुन्हा अधोरेखित केले.
विशेष म्हणजे गझल मुशायरा सत्राचे अध्यक्ष पदाचा सन्मान कारंजा येथील साहित्यिका अँड मंगलाताई नागरे यांना मिळाला.
आपल्या मार्गदर्शक व प्रेरक अध्यक्षीय भाषणा सोबत "प्रेमवेडा" ही अलवार गझल तरन्नुम मध्ये त्यांनी सादर करीत वातावरण गंधाळून टाकले.
अतिशय रंगतदार जोशपूर्ण मैफिलीत कारंजा येथील गझलकारा उज्वला इंगळे यांनी आपल्या दमदार गझल सादरीकरणातून रसिकांना मोहवून टाकले.
कवयित्री संमेलनात कारंजातील कवयित्री शारदा भुयार, कृपा ठाकरे, शरयू जीरापुरे यांनी आपल्या सुरेख कविता सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
ग्रंथ दिंडी ने सुरवात झालेल्या विदर्भ लेखिका साहित्य संमेलन सत्रात खुले अधिवेशन, प्रस्ताव वाचन, सत्कार, आभार प्रदर्शन इत्यादी सर्वच कार्यक्रम नियोजनबध्द पार पडलेत.
अकरा जिल्ह्यातील विदर्भ लेखिका,गोवा येथील लेखिका यांच्या उस्फूर्त सहभागाने गाजलेले हे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन अतिशय लक्षणीय,देखणे,ऐतिहासिक व तुफान यशस्वी ठरल्याची चर्चा विदर्भ लेखिकाच्या समाधानामधून प्रगट होत होती.