अकोला:दि.१८ मे २०२४ स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष व श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे सहायक प्राध्यापक डॉ.विशाल कोरडे यांचा बंगलोर येथून आलेल्या यूजीसीच्या नॅक समितीतर्फे भावपूर्ण सत्कार करण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड सोशल वर्क खडकी येथे शैक्षणिक मूल्यमापन करण्यासाठी आलेल्या युजीसी न्यू दिल्ली अंतर्गत बेंगलोर येथून नॅक समिती अकोल्यात आली होती . डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिझम अँड सोशल वर्क व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला यांचा सामंजस्य करार झाला असल्यामुळे या दोन्ही संस्था अकोल्याच्या विविध क्षेत्रात सामाजिक व शैक्षणिक कार्य करीत आहेत.नॅक समितीच्या स्वागत समारोहात डॉ.विशाल कोरडे व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या वाद्यवृंदा तर्फे संगीतमय कार्यक्रमाची प्रस्तुती करण्यात आली.डॉ.कोरडे यांची संगीत प्रस्तुती संपल्यावर लगेच नॅक समितीचे चेअरपर्सन प्रा.एल्लो अय्यर सिद्धगोडा (बेंगलोर), कोऑर्डिनेटर प्रा.सुसुर बासू (केरळ),नॅक टिम मेंबर डॉ.दिपाली सिंघे (कोलकाता)
यांनी मंचावरून उतरून डॉ.विशाल कोरडे व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या वाद्यवृंदाचा भावपूर्ण सत्कार केला .यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश बोरकर , संस्थेचे अध्यक्ष प्रा.मुकुंद भारसाकळे , शिक्षकवृंद व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते . नॅक च्या समितीद्वारा डॉ.विशाल कोरडे व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला करीत असणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती त्यांनी प्राचार्य डॉ.गणेश बोरकर यांच्याकडून जाणून घेतली .आपल्या भाषणातूनही नॅक समितीद्वारा डॉ.कोरडे यांच्या कार्याचा गौरव त्यांनी केला . या संगीतमय कार्यक्रम प्रस्तुतीसाठी डॉ विशाल कोरडे यांना दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला ची सदस्य अनामिका देशपांडे यांनी सहगायन व दिव्यांग तबलावादक रोहित सूर्यवंशी यांनी तबल्याची साथसंगत केली . कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य अस्मिता मिश्रा, वीणा राठोड, विजय कोरडे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नालिजम अँड सोशल वर्क तर्फे प्रा.कोमल चिमणकर व प्रा.रिजवान खान यांनी सहकार्य केले .