वाशिम : राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यात नेत्रदान पंधरवडा साजरा होत आहे .नेत्रदानाबाबत जनजागृतीच्या हेतुने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हयातील सर्व ग्रामिण रुग्णालयामध्ये नेत्ररुग्णांची प्रथम तपासणी करुन त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हास्तरावर नेत्रशल्य चिकित्सकाकडुन योग्य ते औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात येत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे , अति. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अविनाश पुरी व नेत्र शल्य चिकीत्सक डॉ. आशिष बेदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ स्कुल चिखली येथे नेत्रदान पंधरवाडयानिमित्त नेत्रदाना बाबत व डोळयांच्या विविध आजारावर चर्चासत्र घेउन कोणत्या कारणाने डोळयांचे आजार होतात व ते न होण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहीजे त्याबद्दल सखोल मार्गदर्शन नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे, यांनी केले.
त्याच प्रमाणे नेत्रदान हे एक श्रेष्ठदान आहे. नेत्रदान केल्याने अंध व्यक्तीच्या जिवनात प्रकाश निर्माण होऊ शकते. त्यामुळे नेत्रदान करावे व इतरांनासुध्दा नेत्रदान करण्यासाठी प्रवृत्त करावे असे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ३९ व्या नेत्रदान पंधरवाडयानिमीत्त नेत्रदान या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येउन सर्व विद्यार्थ्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला. तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींनी आम्ही नेत्रदान करण्यासाठी इतरांना सुध्दा प्रवृत्त करु अशी प्रतिज्ञा केली.
कार्यक्रमास मुख्याध्यापक सतिष हागे, डि. ए. चंद्रशेखरे, महेश शिंदे, एस व्हि. खानजोडे, वाय. टी. देवळे, तसेच विद्यार्थीनी व कर्मचारी हजर होते. कार्यक्रमाचे संचालन राम धाडवे यांनी केले व आभार ओम राउत यांनी मानले.