खडसंगी जवळील बरडघाट शेतशिवार जवळील बफर झोन जंगल परिसरात म्हशी चराई करणाऱ्या रितिक तराळे (20) या युवकांवर वाघाने हल्ला करून जखमी केले. जखमीवर चिमूर | उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे प्राथमिक उपचारासाठी आर्थिक मदत म्हणून देण्यासाठी आले असता मदत तोकडी असल्याने ते घेण्याचे कुटुंबीयांनी नाकारली.
खडसंगी जवळील बरडघाट येथील शेतशिवारात स्वतःचे म्हशी चराई करण्यासाठी नेले होते. यावेळी शेताजवळील जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने चरत असणाऱ्या म्हशीवर हल्ला करून ठार केले. दरम्यान दूरवरून कोणाची म्हैस वाघाने मारली, हे पाहत असतानाच त्या वाघाने म्हैस सोडून उपस्थित असलेल्या नागरिकांवर उडी घेऊन हल्ला केला. यावेळी त्या वाघाने रितिकवर हल्ला केला होता. यावेळी रितिकच्या पायाला वाघाच्या पायाचे नख ओरबडल्याने रितिक गंभीर जखमी झाला. खडसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र तेथे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे कारण सांगून चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.